मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

IPL 2021 : '...तेव्हा पृथ्वी शॉने माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि...' पॉण्टिंगने सांगितला किस्सा

IPL 2021 : '...तेव्हा पृथ्वी शॉने माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि...' पॉण्टिंगने सांगितला किस्सा

आयपीएलचा (IPL 2021) नवा हंगाम सुरू होण्याच्याआधी दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने पृथ्वी शॉबाबत खुलासा केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 एप्रिल : आयपीएलचा (IPL 2021) नवा हंगाम सुरू होण्याच्याआधी दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) पृथ्वी शॉने विक्रमी कामगिरी केली. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात एका मोसमात सर्वाधिक रन करण्याचा विक्रम शॉने केला. पण आयपीएलच्या मागच्या मोसमात आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शॉला संघर्ष करावा लागला, त्यामुळे शॉची भारतीय टीममधून गच्छंती झाली. दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने पृथ्वी शॉबाबत खुलासा केला आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात जेव्हा शॉ खराब फॉर्ममध्ये होता, तेव्हा त्याने नेटमध्ये बॅटिंगचा सराव करायला नकार दिल्याचं पॉण्टिंगने सांगितलं.

'मागच्या मोसमात दोन अर्धशतकं केल्यानंतर पृथ्वीचा फॉर्म ढासळला. त्यावेळी मी त्याला नेटमध्ये सराव करायला चलं असं सांगितलं, पण त्याने याला नकार दिला,' असं पॉण्टिंग क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूशी बोलताना म्हणाला.

'मागच्या वर्षी बॅटिंगबद्दलचा त्याचा सिद्धांत रोचक होता. जेव्हा तो रन करत नव्हता, तेव्हा त्याला नेटमध्ये बॅटिंग करायची नव्हती, पण जेव्हा तो रन करत होता तेव्हाच तो नेटमध्ये सराव करायला यायचा. चार-पाच मॅचमध्ये त्याने 10 पेक्षा कमी रन केले, तेव्हा मी त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो आपण नेटमध्ये जाऊन सराव करू आणि नेमकी अडचण काय आहे ते जाणून घेऊ, पण तेव्हा त्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितलं, आणि मी आज बॅटिंगला येणार नाही, असं उत्तर दिलं. मला काहीच समजलं नाही,' असा किस्सा पॉण्टिंगने सांगितला.

आयपीएलच्या या वर्षी पृथ्वी शॉचा सिद्धांत बदलला असेल, असंदेखील पॉण्टिंग म्हणाला. 29 मार्चला रिकी पॉण्टिंगने दिल्लीच्या टीममध्ये प्रवेश केला, आता तो टीमसोबत बायो-बबलमध्ये आहे. 'आता तो बदलला असेल, मागच्या काही महिन्यांमध्ये त्याने स्वत:वर खूप काम केलं आहे. जर असं झालं असेल तर आम्ही पृथ्वीकडून सर्वश्रेष्ठ कामगिरीची अपेक्षा करू. तो भविष्यात सुपरस्टार खेळाडू बनू शकतो. मागच्या वर्षी मी त्याला सल्ला दिला, पण तोदेखील त्याच्या शब्दांवर कायम राहिला,' असं वक्तव्य पॉण्टिंगने केलं.

'पृथ्वीने त्याच्या चांगल्यासाठी स्वत:च्या ट्रेनिंगची पद्धत बदलली असेल. कारण फक्त दिल्ली कॅपिटल्ससाठी नाही तर भविष्यात भारताकडूनही तो खूप क्रिकेट खेळू शकतो. पृथ्वी आणि सचिन यांच्यात खूप साम्य आहे. दोघांची उंची कमी आहे, तसंच दोघंही फ्रंट फूट आणि बॅकफूटवर खूप ताकदीने बॉल मारतात. स्पिनर्सविरुद्धही पृथ्वी आणि सचिन खूप चांगले खेळतात,' असं मत पॉण्टिंगने मांडलं.

First published:

Tags: Delhi capitals, IPL 2021, Prithvi Shaw