चेन्नई, 20 एप्रिल : आयपीएलमध्ये (IPL) सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) मागच्या काही मोसमांमध्ये चमकदार अशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या वर्षीही (IPL 2021) सुरुवातीच्या 4 सामन्यांमध्ये रोहितला चांगली सुरुवात मिळाली, पण त्याला मोठा स्कोअर करता आलेला नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहितने 30 बॉल खेळून 44 रन केले, यामध्ये 3 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. लेग स्पिनर अमित मिश्राने (Amit Mishra) रोहित शर्माची विकेट घेतली. याचसोबत रोहित शर्माच्या नावावर नकोसा रेकॉर्ड झाला.
रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा अमित मिश्राची शिकार झाला आहे. अमित मिश्राने आतापर्यंत 7 वेळा रोहित शर्माला आऊट केलं आहे, तर सुनिल नारायणने (Sunil Narine) 6 वेळा आणि आर. विनय कुमारने (Vinay Kumar) 6 वेळा रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
आयपीएलच्या या मोसमात रोहित शर्मा मुंबईचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू आहे. 4 सामन्यांमध्ये रोहितने 135.29 चा स्ट्राईक रेट आणि 34.50 च्या सरासरीने 138 रन केले आहेत. तर आयपीएल इतिहासात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितने 204 सामन्यांमध्ये 130.73 च्या स्ट्राईक रेटने आणि 31.39 च्या सरासरीने 5,368 रन केले आहेत. यामध्ये एक शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma