Home /News /news /

IPL 2020 :..म्हणून वॉशिंग्टन सुंदर RCB च्या विजयात बजावतोय मोलाची भूमिका

IPL 2020 :..म्हणून वॉशिंग्टन सुंदर RCB च्या विजयात बजावतोय मोलाची भूमिका

सुंदरने आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर बँगलोरचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर असून चेन्नईसारख्या संघालादेखील त्यांनी पराभवाचा धक्का दिला आहे.

    दुबई, 12 ऑक्टोबर : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत. तीनदा चॅम्पियन ठरलेला आणि स्पर्धेतील सर्वाधिक मजबूत समजला जाणारा चेन्नई सुपर किंग्ज संघदेखील अजूनपर्यंत फॉर्ममध्ये आलेला नाही. धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईला आतापर्यंत 5 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या  बाजूला आतापर्यंत एकदाही विजेतेपद न पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला  (RCB) सूर गवसला आहे. या स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळताना या संघाने जबरदस्त कामगिरी केली असून त्यांच्या विजयात ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर महत्वाची भूमिका बजावत आहे. बंगलोरच्या संघात युजवेंद्र चहलच्या रूपाने मजबूत स्पिनर आहे. त्याच्या तुलनेत सुंदर खूपच नवीन गोलंदाज आहे. पण तरीदेखील या मोसमात तो शानदार गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून देत आहे. 6 सामन्यांत त्याने आतापर्यंत 4.88 च्या इकॉनॉमी रेटने 3 विकेट घेतल्या आहेत. या आयपीएलमध्ये सुंदरने आतापर्यंत 4.88 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. सगळ्या संघातील स्पिनरची तुलना केली तर सुंदरची इकॉनॉमी सर्वात कमी आहे. आपल्या गुगलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राशीद खानपेक्षा सुंदर याचा इकॉनॉमी रेट कमी आहे. पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना रोखण्याचं काम सुंदर करत आहे. त्यामुळे बँगलोरच्या इतर गोलंदाजांवर कमी ताण येत आहे. या मोसमात सुंदरने आतापर्यंत 6 सामन्यांत 18 ओव्हर गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने केवळ 88 धावा दिल्या आहेत. म्हणजेच त्याचा इकॉनॉमी रेट हा सहापेक्षा देखील कमी आहे. त्याच्याच तुलनेत युझवेन्द्र चहलाचा इकॉनॉमी रेट हा 7.78  आहे. त्यामुळे बंगलोर संघासाठी तो सध्या सर्वांत महत्त्वाचा गोलंदाज ठरत आहे. या सहा सामन्यांत त्याने ४३ डॉट बॉल टाकले आहेत. म्हणजेच याच्या 108 बॉलपैकी 40 टक्के बॉल हे डॉट टाकले गेले आहेत. हे ही वाचा-शोएब मलिकच्या ऐतिहासिक विक्रमानंतर सानिया मिर्झाची भावुक प्रतिक्रिया या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने आतापर्यंत सर्वात जास्त ओव्हर या पॉवर प्लेमध्ये टाकल्या आहेत. त्यामुळे  फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना गोलंदाजी करणे खूप अवघड असते. फलंदाजांना सहज धावा मिळू शकतात त्यामुळे त्यांना रोखणं गोलंदाजासाठी खूपच कठीण होतं. पण सुंदरने हे कामदेखील सोपे केलं असून त्याच्या प्रतिभेच्या जोरावर त्यानं विकेट देखील घेतल्या आहेत. त्याच्या या प्रदर्शनाच्या जोरावर बेंगलोरचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर असून चेन्नईसारख्या संघालादेखील त्यांनी पराभवाचा धक्का दिला आहे. इतर अनेक स्पिनर उत्तम गोलंदाजी करत आहेत. पण ते मिडल ओव्हर्समध्ये गोलंदाजी करत असल्यानं त्यांच्याकडे फिल्डिंगसाठी अनेक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. त्यामुळं त्यांना गोलंदाजी करणं सोपं जातं.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या