या सामन्यात राजस्थाननं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी तुफानी फलंदाजी केली. दोघांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर पंजाबनं 20 ओव्हरमध्ये 223 धावा केल्या. राजस्थानपुढं 224 धावांचे बलाढ्य आव्हान आहे. दोघांनी राजस्थानच्या गोलंदाजांची पिसं काढत पहिल्या विकेटसाठी तब्बल 183 धावांची भागीदारी केली. यात मयंक अग्रवालनं दुसरं सर्वात जलद शतक पूर्ण केलं. मयंकने 45 चेंडूत शतक पूर्ण केलं. अग्रवाल 50 चेंडूत 106 धावा करत बाद झाला. तर राहुलनं 54 चेंडूत 69 धावा केल्या. 17 ओव्हरमध्ये मयंक तर 18व्या ओव्हरमध्ये राहुल बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि निकोलस पुरन यांची दोन-तीन चांगले शॉट खेळले. दुसरीकडे राजस्थानकडून टॉम कुरन आणि अंकित राजपूत यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. श्रेयस गोपाळ, जोफ्रा आर्चर दोन्ही फलंदाज महागडे ठरले. राजस्थानचा संघ-जॉस बटलर, स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, राहुल तेवातिया, रियान पराग, टॉम कुरन, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकट, अंकित राजपूत. पंजाबचा संघ-मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, करूण नायर, सरफराज खान, जेम्स निशाम, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, शेल्डन कॉटरलMatch 9. It's all over! Rajasthan Royals won by 4 wickets https://t.co/Cx1fa4W08O #RRvKXIP #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) September 27, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2020