बंगळुरू, ०७ एप्रिल- रॉयल चॅलेंजर बँगलोरचा कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या टीमच्या परफॉर्मन्सवर फारसा खूश नाहीये. आतापर्यंत आरसीबीला एकही सामना जिंकता आला नाही. आरसीबीचा आजचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरोधात होता. हा सामनाही विराटचा संघ हरली, त्यामुळे सध्या सोशल मीडियावर विराटला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
एकीकडे मैदानावर निराशाजनक कामगिरी होत असली तर मैदानाबाहेर मात्र विराट चांगलंच एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतंच त्याला पत्नी अनुष्का आणि क्रिकेटर एबी डिविलिअर्सच्या कुटुंबासोबत निवांत क्षण एन्जॉय करताना दिसला. त्याचे एबीच्या मुलासोबत खेळतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आजची दिल्ली कॅपिटल्सविरोधातला सामना ‘करो या मरो’ असा असताना विराट मात्र पत्नीसोबत निवांत क्षण घालवत होता यामुळेच त्याला ट्रोल करण्यात आलं. आयपीएलच्या सर्व टीममध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. असं असलं तरी विराटने अजून आशा सोडली नाही.
दरम्यान, आरसीबीचा दिल्लीने 6 विकेट राखून पराभव केला. 150 धावांचे आव्हान दिल्लीने 6 गड्यांच्या मोबदल्यात 18.5 षटकांत पूर्ण केले. या पराभवाने आरसीबीचं आयपीएलच्या बाद फेरीत प्रवेश करणं कठिण झालं आहे. कसिगो राबाडाच्या भेदक माऱ्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने आरसीबीवर विजय मिळवला.विराट कोहली एका बाजूने फटकेबाजी करत होता. त्याला कासिगो रबाडाने बाद केले. विराटने 33 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकारासह 41 धावा केल्या. त्याच षटकात रबाडाने पवन नेगी आणि अक्षदीप नाथ यांना बाद केले. नेगी शून्यावर तर नाथ 19 धावांवर बाद झाला. 19 व्या षटकात ख्रिस मॉरिसने मोहम्मद सिराजला एका धावेवर बाद केलं. तर टीम साउथी 9 धावांवर तर युझवेंद्र चहल एका धावेवर नाबाद राहिला. दिल्लीकडून रबाडाने 4 षटकांत 21 धावांत 4 बळी घेतले. त्याच्यानंतर ख्रिस मॉरिसने 28 धावांत 2 गडी बाद केले. तर अक्षर पटेल आणि संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
VIDEO : आम्ही काय शिवाजी महाराजांच्या नावानं मत मागतो का? उदयनराजेंचा सवाल