VIDEO : गब्बरचा पत्नीसोबत डान्स, इतर खेळाडू बघतच राहिले

VIDEO : गब्बरचा पत्नीसोबत डान्स, इतर खेळाडू बघतच राहिले

शिखर धवनचा आणि त्याच्या पत्नीचा डान्स करत असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 एप्रिल : आयपीएलच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून खेळाडू थोडी मजा मस्ती करत असतात. यातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. मंगळवारी दिल्लीच्या संघाने पार्टी केली. यात संघाच्या सर्वच खेळाडूंनी डान्स केला.

दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने त्याच्या बायकोसोबत केलेला डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्याशिवाय पृथ्वी शॉ, इशांत शर्मास संघातील इतर खेळाडूही आहेत. शिखर धवनचा मुलगा जोरावरसुद्धा नाचताना दिसतो.

धवनने दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यातील एका व्हिडिओत तो पत्नीसोबत डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत पृथ्वी शॉ आणि जोरावर डान्स करताना दिसतात.

SPECIAL REPORT : 'लाव रे तो व्हिडिओ'

First published: April 18, 2019, 11:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading