IPL 2019 : रहाणेकडं पुन्हा येणार कर्णधारपद? 'हा' विदेशी खेळाडू परतणार मायदेशी

IPL 2019 : रहाणेकडं पुन्हा येणार कर्णधारपद? 'हा' विदेशी खेळाडू परतणार मायदेशी

आयपीएल संपल्यानंतर लगेचच आयसीसी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्याच्या तयारीसाठी विदेशी खेळाडू मायदेशी परतत आहेत.

  • Share this:

जयपूर, 27 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात आता प्ले ऑफकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू हे संघ आपलं स्थान पक्क करण्यासाठी झगडत आहेत. त्यात आता राजस्थान संघाच्या अडचणीत वाढ झाली आहेत. त्याचं कारण म्हणजे एकापाठोपाठ एक विदेशी खेळाडू माघारी परतत आहेत.

आयपीएल संपल्यानंतर लगेचच आयसीसी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्याच्या तयारीसाठी विदेशी खेळाडू मायदेशी परतत आहेत. त्यात आता अगदी मोक्याच्या क्षणी राजस्थान संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ मायदेशी परतणार आहे. त्यामुळं पुन्हा अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद येण्याची शक्यता आहे.

राजस्थान संघाचा पुर्व कर्णधार अजिंक्य रहाणेच्या अपयशानंतर त्याला कर्णधारपदावरून काढण्यात आले. त्याची जागा घेतली ती, चेंडू फेरफारी प्रकरणामुळं बंदी घातलेल्या स्टीव्ह स्मिथवर. मात्र, राजस्थानकरिता स्मिथ पावला आणि राजस्थानच्या संघानं दोन सामने जिंकले. स्मिथची वर्ल्ड कपसंघात निवड झाल्यामुळं 30 एप्रिल रॉयल चॅंलेजर्स बंगळुरू विरोधात स्मिथ आपला शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर विश्वचषकाच्या तयारीकरिता स्मिथ मायदेशी परतणार आहे. याआधी संघातील प्रमुख खेळाडू बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर हे विश्वचषकासाठी इंग्लंडला परत गेले.आज राजस्थानचा संघ सनरायजर्स हैदराबाद विरोधात लढणार आहे. दरम्यान या दोन्ही संघातील विदेशी खेळाडू मैदानावर दिसणार नाही आहेत. राजस्थानचे तीन खेळाडू तर, हैदराबादचा स्फोटक फलंदाज जॉनी बेयरस्टो मैदानात दिसणार आहे. हैदराबादने दहापैकी पाच सामने जिंकले, तर राजस्थानने ११ पैकी केवळ चारच सामने जिंकले आहेत. अष्टपैलू आर्चरने गुरुवारी केकेआरवरील रोमहर्षक विजयात मोलाची भूमिका बजावली होती. इंग्लंडच्या तिन्ही खेळाडूंची राजस्थानला उणिव जाणवणार असली तरी अजिंक्य रहाणे आणि स्टीव्ह स्मिथ हे फॉर्ममध्ये असलेले खेळाडू संघाची ताकद आहेत.राजस्थानसाठी आसामचा रियान पराग महत्त्वाचा फलंदाज ठरु शकतो. त्यानं फलंदाजी आणि गोलंदाजीत यंदा चमक दाखविली. केकेआरविरुद्ध त्याने 31 चेंडूत 47 धावा केल्या होत्या. संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी यांनी मोलाचे योगदान दिले असून टर्नर आणि लियॉन लिव्हिंगस्टोन यांना अद्याप सूर गवसलेला नाही. गोलंदाजीत वरुण अ‍ॅरोन, ओशने थॉमस, धवल कुलकर्णी आणि जयदेव उनाडकट यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.


VIDEO: महापालिकेत राडा, शिवसैनिकाने अभियंत्याला बूट फेकून मारला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 09:24 AM IST

ताज्या बातम्या