IPL 2019 : 'या' खेळाडूंनी गाजवल्या CSK आणि RCB यांच्यातील लढती

CSK vs RCB सामन्यात दोन्ही संघातील या खेळाडूंनी आतापर्यंत संघाला अनेकवेळा अडचणीतून बाहेर काढलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 03:11 PM IST

IPL 2019 : 'या' खेळाडूंनी गाजवल्या CSK आणि RCB यांच्यातील लढती

आयपीएलच्या 12 व्या हंगामाला  आरसीबी आणि सीएसके यांच्यातील लढतीने सुरुवात होणार आहे. आतापर्यंतच्या 21 लढतीपैकी सीएसकेने 14 तर आरसीबीने 7 वेळा विजय मिळवला आहे.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सीएसकेविरुद्ध खेळताना 732 धावा केल्या आहेत. यात त्याने 6 पेक्षा जास्त अर्धशतके केली आहेत. याशिवाय 12 सामन्यात 30 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 44 चेंडूत 70 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

सीएसकेचा कर्णधार धोनीने आरसीबीविरुद्ध 20 सामन्यात 610 धावा केल्या आहेत. मधल्या फळीत खेळणाऱ्या धोनीने 34 चेंडूत 70, 28 चेंडूत 49 आणि 30 चेंडूत 65 धावांची तडाखेबाज खेळी केली आहे.

Loading...

जहीर खानने आरसीबीकडून खेळताना 13 विकेट घेतल्या आहेत. 2011 मध्ये बेंगळुरुत खेळताना 19 धावांत 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

श्रीलंकेचा ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनने सीएसके आणि आरसीबी या दोन्ही संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 13 विकेट घेतल्या आहेत. त्याने प्रत्येक सामन्यात सरासरी 50 टक्के चेंडू निर्धाव टाकले आहेत.

अल्बी मॉर्केलने सीएसकेकडून 2008 ते 2013 या काळात तर आरसीबीकडून 2014 मध्ये खेळला. यात त्याने 12 सामन्यात 15 विकेट घेतल्या. पहिल्या आयपीएलमध्ये 32 धावात 4 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. याशिवाय फलंदाजीतही त्याने 7 चेंडूत 28 धावा करण्याची कमाल केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 03:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...