मुंबई, 02 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामातील मुंबई आणि हैदराबाद यांच्यात गुरुवारी सामना होणार आहे. घरच्या मैदानावर असलेल्या या सामन्यात विजय मिळवून मुंबई गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकते. शेवटच्या सामन्यात त्यांनी आरसीबीला हरवले होते. तर सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभूत केले होते.
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 13 सामने झाले आहेत. यात हैदराबादने 7 तर मुंबईने 6 सामने जिंकले आहेत. गुणतक्त्यात चेन्नई 18 गुणांसह अव्वल स्थानी असून दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीचे 16 गुण झाले आहेत. त्यानंतर मुंबईचे 14 आणि हैदराबाचे 12 गुण झाले आहेत. सनरायझर्स हैदराबादला आता डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो यांची उणीव भासणार आहे. याचा फायदा मुंबईला होईल.
पॉइंट टेबल
सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट