ईडन गार्डनवर पांड्याचं वादळ, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय

पांड्याच्या तुफान फटकेबाजीनंतरही मुंबईचा 34 धावांनी पराभव झाला.

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 11:42 AM IST

ईडन गार्डनवर पांड्याचं वादळ, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय

मुंबईला केकेआरविरुद्ध जरी पराभव पत्करावा लागला असला तरी हार्दिक पांड्याने आपल्या वेगवान खेळीने विक्रम नोंदवला आहे. कोलकाताने दिलेल्या 233 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 198 धावाच करता आल्या.

मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 91 धावा केल्या. पांड्या मैदानात होता तोपर्यंत मुंबईला विजयाच्या आशा होत्या. पांड्याने केलेल्या 91 धावा या लीगमध्ये सहाव्या क्रमांकावर तसेच त्यानंतर फलंदाजी करताना केलेल्या सर्वाधिका धावा ठरल्या आहेत.

पांड्याने 34 चेंडूत 6 चौकार आणि 9 षटकारांसह 91 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी खालच्या क्रमांकावर य़ेऊन जास्त धावा करण्याचा विक्रम आंद्रे रसेलच्या नावावर होता. त्याने गेल्यावर्षी 88 धावा केल्या होत्या.

Loading...

हार्दीक पांड्याने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमध्ये मुंबईकडून हे तिसरं सर्वात वेगवान अर्धशतक आहे. याआधी किरॉन पोलार्ड आणि इशान किशनने 17 चेंडूत अर्धशतक केलं होतं.

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात केलेलं अर्धशतक हे यंदाच्या हंगामातील वेगवान अर्धशतक ठरलं आहे. त्याने दिल्लीचा फलंदाज रिषभ पंतला मागे टाकलं. पंतने 18 चेंडूत अर्धशतक केलं होतं.

पांड्याने केकेआर विरुद्धच्या खेळीने टी 20 मध्ये 2000 धावा आणि 100 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. रविंद्र जडेजानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2019 11:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...