IPL 2019 : ख्रिस गेल बनला रजनीकांत, VIDEO झाला व्हायरल

गेल आपल्या प्रत्येक सामन्यानंतर मैदानावर भांगडा करताना दिसतो. फलंदाजीत मात्र त्याच्यासमोर गोलंदाज भांगडा करतात.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 08:14 PM IST

IPL 2019 : ख्रिस गेल बनला रजनीकांत, VIDEO झाला व्हायरल

मोहाली, 22 एप्रिल : ख्रिस गेल अर्थात युनिवर्सल बॉस त्याच्या हटक्या स्टाईल आणि तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याच्या फलंदाजीपेक्षा त्याच्या सेलिब्रेशनची आणि नृत्याची वेगळीच चर्चा मैदानाबाहेर रंगते. नेहमीच वेगवेगळ्या रुपात असणारा गेल सध्या थलैवाच्या रुपात दिसला.

गेलनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात गेल थलैवा म्हणजेच रजनीकांतची स्टाईल मारताना दिसला. गेलनं रजनीकांत स्टाईलनं डोळ्याला चष्मा लावला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ख्रिस गेल आयपीएलच्या बाराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत आहे. गेल आपल्या प्रत्येक सामन्यानंतर मैदानावर भांगडा करताना दिसतो. फलंदाजीत मात्र त्याच्यासमोर गोलंदाज भांगडा करतात. गेलनं आतापर्यंत 159.47च्या स्ट्राईक रेटनं 421 धावा केल्या आहेत. यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये गेल सध्या तीसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबसंघाकडून मात्र त्यानं सर्वात जास्त धावा केल्या आहेत.

पंजाब संघ आयपीएलच्या गुणतालिकेत 10 पैकी 5 सामन्यात विजय मिळवून सध्या 5व्या क्रमांकावर आहे. बुधवारी पंजाबचा संघ बंगळुरू विरोधात लढणार आहे. दरम्यान प्ले ऑफमध्ये आपली गाठण्यासाठी या सामन्यात पंजाबला विजय मिळवणे गरजेचे असणार आहे.

पॉइंट टेबल


सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज


क्रीडा विश्वातील घडामोडींचा सुपरफास्ट आढावाSPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 08:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close