कार्ती चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर

कोर्टाने 10 लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. तसंच देश सोडण्यास मनाई केली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2018 04:04 PM IST

कार्ती चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर

23 मार्च : आयएनएक्स मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाने अखेर सशर्त जामीन मंजूर केलाय. कोर्टाने 10 लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. तसंच देश सोडण्यास मनाई केली आहे. तसंच कोर्टाने 16 मार्चचा निर्णय राखून ठेवला आहे.

दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश  एसपी गर्ग यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने कार्ती चिदंबरम यांना जामीन मिळाला असून आता अटक करता येणार नाही अशी सुचना ईडीला केली आहे. या प्रकरणी कोर्टाने केंद्र सरकार आणि ईडीला नोटीस सुद्धा जारी केलाय.

कोर्टाने 10 रुपयाच्या बाँडवर जामीन दिलाय. यादरम्यान, कार्ती चिदंबरम यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच बँक अकाऊंट बंद करू शकत नाही. तसंच कोर्टाने सीबीआय सोबत सहकार्य करण्याचे आणि साक्षीदारांवर दबाव न टाकण्याची सुचनाही केलीय.

विशेष म्हणजे, पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीने आरोप केला होता की माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यासोबत नार्थ ब्लाॅक कार्यालयात भेट झाली होती. या दोघांनी पी चिदंबरम यांच्याकडून आपल्या कंपनीसाठी परदेशी गुंतवणुकीसाठी मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती.

या भेटीनंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पी चिदंबरम यांनी आपला मुलगा कार्ती चिदंबरम याला व्यवसायात मदत करावी अशी सुचना केली होती. त्यानंतर पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी हे दिल्लीतील एका हाॅटेलमध्ये कार्ती यांना भेटले होते. यावेळी त्यांनी 10 लाख डाॅलरची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2018 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...