मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

फिल्म इंडस्ट्रीच्या कलाकारांना 'भारत जोडो' यात्रेचं निमंत्रण, पण... नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

फिल्म इंडस्ट्रीच्या कलाकारांना 'भारत जोडो' यात्रेचं निमंत्रण, पण... नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे. सोमवारी देगलूरमध्ये राहुल गांधी पोहोचणार आहेत, त्याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गौप्यस्फोट केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nanded, India
  • Published by:  Shreyas

नांदेड, 6 नोव्हेंबर : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे. सोमवारी देगलूरमध्ये राहुल गांधी पोहोचणार आहेत, त्याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गौप्यस्फोट केला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं निमंत्रण फिल्म इंडस्ट्रीच्या कलाकारांना देण्यात आलं होतं, पण भाजपच्या भीतीपोटी कलावंतांनी यायला नकार दिला, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

'नकार देणाऱ्या कलाकारांची नावं सांगणार नाही, कारण त्यांना अडचण होईल. पण मोठ्या मोठ्या टॉपच्या हिरो-हिरोईनचं म्हणणं आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत. देशात इतकी अराजकाची स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. मुंबईतील फिल्म सिटी उत्तर प्रदेशमध्ये नेण्याचा प्रयत्न झाला. कलावंतांमध्ये भय निर्माण झाल्याचे त्यांच्या भावना ऐकून मला कळाले,' असं नाना पटोले म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर येणाऱ्या दोन चित्रपटात महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवण्यात आल्याने या चित्रपटांना छत्रपती संभाजी महाराज यांनी विरोध केला आहे. दरम्यान याबाबत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. छत्रप्ती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन केला जाणार नाही . छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, त्यांचा चुकीचा इतिहास कोणी दाखवत असेल, तर सहन केले जाणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला. संभाजी महाराजांनी जो विरोध केला त्याला आमचा पाठिंबा असल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलं.

राहुल गांधींच्या यात्रेचा कार्यक्रम

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला संध्याकाळी तेलंगणामधून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात दाखल होणार आहे. रात्री 8 च्या सुमारास यात्रा देगलुरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधींचं स्वागत होईल. यानंतर रात्री 9 वाजता देगलुरपासून 9 किमी अंतरावर असलेल्या वन्नाळी मधल्या गुरूद्वारापर्यंत मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. रात्री साधारणत: 12 वाजेपर्यंत ही यात्रा गुरूद्वारात पोहोचेल. 8 नोव्हेंबरला गुरूनानक जयंती असल्यामुळे नियोजित यात्रेत हा बदल करण्यात आला आहे.

गुरूद्वारामध्ये दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी खासगी वाहनाने देगलुरमध्ये जाऊन मुक्काम करणार आहेत, त्यानंतर दुसऱ्या दिवशी नियोजित वेळेनुसार पदयात्रेला सुरूवात होणार आहे.

First published:

Tags: Nana Patole, Rahul gandhi