Home /News /news /

परमवीर सिंग यांच्याप्रमाणेच रश्मी शुक्लांची चौकशी करा, माजी पोलीस अधिकाऱ्यांची मागणी

परमवीर सिंग यांच्याप्रमाणेच रश्मी शुक्लांची चौकशी करा, माजी पोलीस अधिकाऱ्यांची मागणी

धनंजय धुमाळ यांनी रश्मी शुक्ला यांच्या नावे 25 लाख रुपयांची मागणी केली, त्याचे स्टिंग ऑपरेशन संदीप जाधव यांनी केलं होतं.

पुणे, 28 एप्रिल: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्यापाठोपाठ आता अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla IPS) यांचीही चौकशी करा अशी मागणी पुण्याचे निवृत्त पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ (Dhanjay Dhumal) यांनी केली आहे. पुण्यात निवृत्त पोलीस अधिकारी धनंजय धुमाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन 25 लाख प्रकरणाबाबत खुलासा केला आहे. 'रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना धनंजय धुमाळ यांनी एका प्रकरणात 25 लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून धुमाळ यांना निलंबित करण्यात आले होते. त्यावेळेस तक्रारकर्ते संदीप जाधव यांनी धुमाळ यांनी पोलीस आयुक्तांच्या नावे पैसे मागितल्याचा आरोप केला होता, मात्र आपण अशी कुठलीही मागणी केली नव्हती तरीही काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्ला यांनी आपल्यावर चुकीची कारवाई केली', असा आरोपही धुमाळ यांनी केला. IPL 2021 : आयपीएलनंतरही या देशाचे खेळाडू भारतातच थांबणार, कारण... 'या प्रकरणाची चौकशी आपला संबंध नसताना आपल्याकडे जबरदस्तीने रश्मी शुक्ला यांनी दिली होती, त्याच वेळेस असा काही प्रकार घडू शकतो अशी कल्पना रश्मी शुक्ला यांना दिली होती, तरीही त्यांनी जबरदस्तीने या प्रकरणाचा तपास मला करायला लावला', असा आरोप धुमाळ यांनी केला. IPL 2021: मॅच संपल्यानंतर कोहलीनं घेतला पंतचा क्लास, पाहा VIDEO त्यामुळे गेले काही दिवस सोशल मीडियात 25 लाख रुपये मागितल्याची धुमाळ यांची बातमी पुन्हा वायरल झाली आहे. त्यामुळे आपण व कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास होत असून त्या वेळचे तक्रारकर्ते संदीप जाधव , तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सगळ्याची राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. काय आहे धनंजय धुमाळ यांचं खंडणी प्रकरण सहा वर्षापूर्वी एका जागेच्या वादातून चतुशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र हा तक्रार अर्ज पोलीस स्टेशनची चौकशी करण्याऐवजी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी थेट धनंजय धुमाळ यांच्याकडे चौकशीसाठी दिला होता. त्यावेळी धनंजय धुमाळ हे रश्मी शुक्ला यांच्या खास मर्जीतले अधिकारी म्हणून ओळखले जात होते. याच प्रकरणात यांची चौकशी करण्यात आली. त्यात संदीप जाधव यांच्याकडे धनंजय धुमाळ यांनी रश्मी शुक्ला यांच्या नावे 25 लाख रुपयांची मागणी केली, त्याचे स्टिंग ऑपरेशन संदीप जाधव यांनी केलं होतं. ‘राजकीय नेत्यांना लॉकडाऊनचे नियम नाही का?’; केदार शिंदेचा रोखठोक सवाल हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर जाधव यांनी केलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण आपल्या अंगलट यायला नको म्हणून रश्मी शुक्ला यांनी धनंजय धुमाळ यांची खात्यांतर्गत चौकशी लावून त्यांना निलंबित केलं होतं. त्यानंतर जवळपास दीड वर्ष रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त पदावर होत्या. मात्र त्यांनी धुमाळ यांची चौकशी पूर्ण होऊ दिली नाही आणि धुमाळ दरम्यान निवृत्त झाले आता पुन्हा रश्मी शुकला आणि राज्य सरकार यांच्या वादात धुमाळ यांची 25 लाख रुपये मागितल्याचे जुनी बातमी माध्यमांमध्ये व्हायरल झाली आणि त्याचा खुलासा करण्यासाठी धनंजय धुमाळ हे माध्यमांसमोर आले होते.
Published by:sachin Salve
First published:

Tags: IPS Officer, Maharashtra, Mumbai, Mumbai police

पुढील बातम्या