रोमँटिक ठिकाणी अनोळखी व्यक्तिंना Kiss करते ही तरुणी, कारण ऐकून बसेल धक्का

रोमँटिक ठिकाणी अनोळखी व्यक्तिंना Kiss करते ही तरुणी, कारण ऐकून बसेल धक्का

सुरुवातीला ती जरा बिचकत होती. मात्र तिला पॅरिसला आयफेल टॉवरजवळ यश मिळालं आणि मग काय क्रिस्टिआना सुसाटच सुटली.

  • Share this:

पॅरिस 15 नोव्हेंबर : पर्यटनासाठी धाडसी मोहिमा आखून त्या पार पडणारे अनेक पर्यटक आपल्याला माहित आहेत. त्यांच्या साहसाच्या अनेक कथाही कायम पुढे येत असतात. मात्र एकटीने पर्यटनाला बाहेर पडून अनोळखी व्यक्तिंना Kiss करण्याचा छंदच एका तरुणीला जडलाय. त्याचे फोटोही ती कायम सोशल मीडियावर टाकत असते. हे फोटो आता व्हायरल झाले असून तिच्या या कृतीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. रोमँटिक पर्यटनस्थळी जायचं आणि देखण्या व्यक्तिंना विचारून Kiss करायचं आणि त्याचा फोटो काढायचे असा छंदच या तरुणीला जडलाय. त्या तरुणीचं नाव आहे क्रिस्टिआना कुयूकी. क्रिस्टिआना ही कोसोवोची राहणारी आहे.

EXCLUSIVE: नवी कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट

क्रिस्टिआनाला जगभर फिरण्याची सवय आहे. अन तेही जगभरातल्या रोमँटिक स्थळी. ती अशा रोमँटिक स्थळी तर जाते पण एकटी. ती जेव्हा अशी एकटीने फिरायची तेव्हा अशा ठिकाणी येणाऱ्या कपल्सचा तिला हेवा वाटायचा. त्यांचं प्रेम, रोमान्स आणि त्यांचे फोटो काढणं पाहून तिला एक आयडीया सुचली. ही आयडीया होती अनोळखी व्यक्तिंना विचारायचं आणि त्यांना Kiss करत फोटो काढायचा अशी तिची भन्नाट कल्पना.

सुरुवातीला ती जरा बिचकत होती. मात्र तिला पॅरिसला आयफेल टॉवरजवळ यश मिळालं आणि मग काय क्रिस्टिआना सुसाटच सुटली. जगभरातल्या अशा  अनेक रोमँटिक स्थळी क्रिस्टिआनाने अनोळखी व्यक्तिंना Kiss करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. ती असं का करते याचं तिने सांगितलेलं  कारणही तेवढच भन्नाट आहे. रोमँटिक ठिकाणी जाऊन आपणही सुट्टी एन्जॉय केली असं लोकांना वाटावं यासाठी आपण असं करतो असं तीने सांगितलंय. असे अनेक फोटो तिने आपल्या ट्विटर अकाउंटवर टाकले असून ते हजारो वेळा रिट्विटही झाले आहेत.

First published: November 15, 2019, 4:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading