वेटरनं सँडविच द्यायला केला उशीर, ग्राहकानं गोळ्या झाडून केली हत्या

वेटरनं सँडविच द्यायला केला उशीर, ग्राहकानं गोळ्या झाडून केली हत्या

पिझ्झा-सँडविच रेस्टॉरंटमध्ये आलेल्या एका ग्राहकानं वेटरची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

पॅरिस, 18 ऑगस्ट : पिझ्झा-सँडविच रेस्टॉरंटमध्ये आलेल्या एका ग्राहकानं वेटरची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ग्राहकानं सँडविचची ऑर्डर दिली होती, पण त्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागल्यानं त्याला प्रचंड राग आला. रागाच्या भरातच त्यानं तेथेच वेटरवर गोळ्या झाडल्या. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ही धक्कादायक घटना आहे.

(पाहा :'पाक रिटर्न' मिकाचा बदलला सूर, आता म्हणतो,'भारत माता की'!)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नॉइजी-ले-ग्रँड या रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री गोळीबाराचा आवाज आला. हॉटेलमध्ये अन्य कर्मचाऱ्यांनी बाहेर येऊन पाहिलं तर त्यांचा सहकारी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर तातडीनं या प्रकाराची पोलिसांनी माहिती देण्यात आली. दरम्यान, गोळीबारात वेटरचा जागीच मृत्यू झाला.

(वाचा : मृत मुले पुन्हा जिवंत होतील, या आशेने जिल्हा रुग्णालयात मिठात ठेवले मृतदेह)

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बंदुकधारी व्यक्तीनं ऑर्डर केलेलं सँडविच तयार होण्यास बराच वेळ लागला होता. याचाच त्याला प्रचंड राग आला. राग अनावर झाल्यानं त्यानं वेटवर गोळी झाडली आणि तेथून पसार झाला. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

(वाचा :नांदेड: काँग्रेसचे 'गोल्डमॅन' गोवींद कोकुलवार यांच्या पाठीवर झाडली गोळी)

SPECIAL REPORT : तिहार तुरूंग गँगस्टरचं tiktok, पकडणाऱ्या पोलिसालाच दिली धमकी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 07:01 AM IST

ताज्या बातम्या