VIDEO: भाव नाही तरी म्हणे आम्हीच राव! अमेरिकेच्या एअरपोर्टवर पाक PMची झाली फजिती

VIDEO: भाव नाही तरी म्हणे आम्हीच राव! अमेरिकेच्या एअरपोर्टवर पाक PMची झाली फजिती

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देखील अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पण येथे पोहोचल्यावर त्यांची संपूर्ण जगासमोर मोठी फजिती झाल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

ह्यूस्टन, 22 सप्टेंबर : लोकसभा निवडणूक 2019मध्ये दणदणीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथे होणाऱ्या यूएनजीए (UNGA)बैठक आणि महत्त्वाचे म्हणजे 'हाउडी मोदी' कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. यासाठी ते टेक्सासमधील ह्यूस्टन शहरात दाखल देखील झाले आहेत. विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी व्यवसाय आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे संचालक क्रिस्तोफर ओल्सन, अमेरिकेचे राजदूत कॅनेथ जस्टर यांच्यासह अमेरिकेतील भारतीय राजदूत हर्षवर्धन श्रंगलादेखील उपस्थित होते.

(वाचा :काँग्रेस-राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असणाऱ्या आमदारांचीच वाढली डोकेदुखी)

दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देखील यूएनजीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर अमेरिकेचा एकही अधिकारी पोहोचला नाही. यामुळे त्यांची पुन्हा एकदा जगासमोर फजिती झाल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तान आणि पंतप्रधान इमरान खान यांच्या अमेरिकेत झालेल्या या अपमानाची जगभरासह पाकमधील पत्रकारांनाही सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे.

(वाचा : हायप्रोफाईल डबल मर्डर! रेपचा प्लान फसला म्हणून आमदाराची भाची आणि तिच्या बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या)

आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका मोठा अपमान होत असतानाही पंतप्रधान इमरान खान मात्र आपल्याच तोऱ्यात वावरताना दिसले. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानच्या जनतेनं आपल्याचं पंतप्रधानांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 'तुमच्या स्वागतासाठी अमेरिकेतील कोणताही छोटा-मोठा अधिकारी का उपस्थित नव्हता?',असा प्रश्न पाकच्या नागरिकांना विचारला आहे.

Loading...

(वाचा : अमेरिकेत पोहोचलेल्या PM मोदींवर कौतुकाचा वर्षाव, असं नेमकं काय केलं पाहा VIDEO)

दुसरीकडे, टेक्सासच्या ह्यूस्टन येथे होणाऱ्या 'हाउडी मोदी' (Howdy Modi) या कार्यक्रमावर सर्वाच्याच नजर आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यूस्टन येथे दाखल झाले आहेत. यावेळेस ह्यूस्टन विमानतळावर एक अशी घटना घडली की ते दृश्य पाहून लोकांकडून पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा प्रचंड वर्षाव सुरू आहे. पंतप्रधान मोदींचं स्वच्छता प्रेम केवळ देशातच नाही तर परदेशातही सर्वश्रुत आहे. अमेरिकेच्या धरतीवरूनही मोदींनी स्वच्छता अभियानाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं आहे. विमानतळावर अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांनी  पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत केलं. यादरम्यान उपस्थित असलेल्या एका महिला अधिकाऱ्यानं पंतप्रधान मोदींचं स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ भेट स्वरुपात दिला. यावेळेस फुलांच्या गुच्छ्यातील एक दांडी खाली जमिनीवर पडली. ही बाब जशी पंतप्रधानांच्या लक्षात आली तसं त्यांनी लगेचच स्वतः खाली वाकून ती उचलली आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याच्या हातात दिली.

पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरू आहे. एका युजरनं पंतप्रधानांचं कौतुक करत लिहिलंय की,'भलेही दिसायला ही गोष्ट फार छोटी दिसत असेल, पण याच साधेपणानं त्यांना एक मोठा नेता बनवलं आहे.' यापूर्वीही अशा अनेक उदाहरणांमधून पंतप्रधान मोदींनी आपलं स्वच्छता प्रेम दाखवून दिलं आहे.

'हाउडी मोदी' कार्यक्रमाची जय्यत तयारी

दरम्यान,लोकसभा निवडणूक 2019 मध्ये दणदणीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. रविवारी रात्री (22 सप्टेंबर)टेक्सासच्या ह्युस्टनमध्ये 'हाउडी मोदी' (Howdy Modi) कार्यक्रमास ते संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ह्युस्टनच्या NRG स्टेडिअममध्ये 'टेक्सास इंडिया फोरम'तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी 50 हजारहून अधिक लोकांना संबोधित करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 01:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...