VIDEO : अमेरिकेत एकीकडे 'मोदी-मोदी', तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची अशी झाली फजिती

VIDEO : अमेरिकेत एकीकडे 'मोदी-मोदी', तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची अशी झाली फजिती

एकीकडे अमेरिकेत 'मोदी-मोदी' असा जयघोष केला जात असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मात्र फजिती झाल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

ह्यूस्टन, 23 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत सध्या जिकडे-तिकडे 'नमो नमो' नारा ऐकायला मिळत आहे. ह्यूस्टन येथील एनआरजी स्टेडिअममध्ये रविवारी (22 सप्टेंबर) पंतप्रधान मोदींनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या जनसमुदायाला संबोधित केलं. मोदींनी हिंदीतून आपल्या भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांनी 'मोदी-मोदी'चे नारे देण्यास सुरुवात केली. एकीकडे अमेरिकेत 'मोदी-मोदी' असा जयघोष केला जात असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मात्र फजिती झाल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देखील यूएनजीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. पण त्यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर अमेरिकेचा एकही अधिकारी पोहोचला नाही. यामुळे त्यांची पुन्हा एकदा जगासमोर फजिती झाल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तान आणि पंतप्रधान इमरान खान यांच्या अमेरिकेत झालेल्या या अपमानाची जगभरासह पाकमधील पत्रकारांनाही सोशल मीडियावर खिल्ली उडवली.

(वाचा :... आणि यांना काश्मीर पाहिजे; पाकमधील व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!)

आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका मोठा अपमान होत असतानाही पंतप्रधान इमरान खान मात्र आपल्याच तोऱ्यात वावरताना दिसले. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानच्या जनतेनं आपल्याचं पंतप्रधानांवर प्रश्नांची सरबत्ती केली. 'तुमच्या स्वागतासाठी अमेरिकेतील कोणताही छोटा-मोठा अधिकारी का उपस्थित नव्हता?',असा प्रश्न पाकच्या नागरिकांना विचारला.

(वाचा :कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री घटली; कारण आहे...)

पंतप्रधान मोदींचं विमानतळावर स्वागत करण्यासाठी व्यवसाय आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे संचालक क्रिस्तोफर ओल्सन, अमेरिकेचे राजदूत कॅनेथ जस्टर यांच्यासह अमेरिकेतील भारतीय राजदूत हर्षवर्धन श्रंगलादेखील उपस्थित होते.

(वाचा : थॉमस कुक ट्रॅव्हल कंपनी एका रात्रीत बंद, 6 लाख पर्यटक अडकले)

यावेळेस ह्यूस्टन विमानतळावर एक अशी घटना घडली की ते दृश्य पाहून लोकांनी पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा प्रचंड वर्षाव केला. पंतप्रधान मोदींचं स्वच्छता प्रेम केवळ देशातच नाही तर परदेशातही सर्वश्रुत आहे. अमेरिकेच्या धरतीवरूनही मोदींनी स्वच्छता अभियानाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. विमानतळावर अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत केलं. यादरम्यान उपस्थित असलेल्या एका महिला अधिकाऱ्यानं पंतप्रधान मोदींचं स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ भेट स्वरुपात दिला. यावेळेस फुलांच्या गुच्छ्यातील एक दांडी खाली जमिनीवर पडली. ही बाब जशी पंतप्रधानांच्या लक्षात आली तसं त्यांनी लगेचच स्वतः खाली वाकून ती उचलली आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याच्या हातात दिली.

Special Report : मनसेचं ठरलं! 122 जागांसाठी अशी केली तयारी

Published by: Manoj Khandekar
First published: September 23, 2019, 10:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading