पती,पत्नी और वो! विश्वासघात सहन न झाल्यानं नवऱ्यानं 2 मुलांसहीत 9व्या मजल्यावरून मारली उडी

पती,पत्नी और वो! विश्वासघात सहन न झाल्यानं नवऱ्यानं 2 मुलांसहीत 9व्या मजल्यावरून मारली उडी

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे हताश झालेल्या पतीनं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं आहे.

  • Share this:

मॉस्को, 8 ऑक्टोबर : पत्नीकडून झालेला विश्वासघात सहन न झाल्यानं एका पतीनं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यानं आपल्या दोन लहान मुलांसहीत नवव्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव रोमन मिखइलोव (30 वर्ष Roman Mikhailov)असं होतं. अंगावर काटा आणणारी रशियामध्ये घडली आहे.

नेमकी काय आहे घटना?

रोमन मिखइलोव रशियातील सारातोव येथील रहिवासी होता. ज्या दिवशी रोमननं आत्महत्या केली,त्याच दिवशी त्याची पत्नी तिहेरी तलाकसाठी कागदपत्रं दाखल करण्यासाठी गेली होती. यामुळे हताश झालेल्या रोमननं आपल्या दोन मुलांसह फोटो काढला आणि पत्नी इरिनाला मोबाइलवर पाठवला. त्यानंतर त्यानं दोन मुलांसह नवव्या मजल्यावरून खाली उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली.

(वाचा : धार्मिक कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू, LIVE VIDEO VIRAL)

18 महिन्यांचा मुलगा आणि 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

फोटो पाहिल्यानंतर इरिनानं तातडीनं घर गाठण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. पतीला आत्महत्या करण्यापासून रोखण्याचे तिचे प्रयत्न असफल ठरले. कारण रोमन, तिचा 18 महिन्यांचा मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिच्या 4 वर्षांच्या मुलीनं उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

(वाचा : प्रियकरासोबत बनवला पतीला संपवण्याचा प्लान, नवऱ्याचे तुकडे-तुकडे परिसरात फेकले)

पत्नीच्या विश्वासघातानं घेतला कुटुंबाचा बळी

'डेली मेल'नं दिलेल्या वृत्तानुसार, रोमनच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते. यामुळे तो अतिशय नैराश्यामध्ये होता. पत्नीच्या प्रेमसंबंधांमुळे तो प्रचंड तणावात होता. रोमनला माहिती होतं की पत्नी आपल्याला घटस्फोट देणार आहे. पत्नीनं केलेला विश्वासघात सहन न झाल्यानं रोमननं आपल्या मुलांसहीत आत्महत्या केली.

(वाचा : पतीसाठी नराधमांचं ऐकलं, तिघांनी महिलेवर बलात्कार करून शूट केला VIDEO)

रोमननं पत्नीच्या नावावर लिहिली सुसाइड नोट

पोलिसांना घटनास्थळावरून सुसाइड नोटदेखील सापडली. ज्यामध्ये रोमननं या घटनेस पत्नी इरिनाला जबाबदार ठरवलं. पती आणि मुलांच्या मृत्युमुळे इरिनाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

'एक बंदर पोलीस स्टेशन के अंदर', थेट अधिकाऱ्याच्या डोक्यावरच बसले माकड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 07:07 PM IST

ताज्या बातम्या