पाकच्या पंतप्रधानांची घाबरगुंडी, काश्मीरसंदर्भात जिहाद्यांना दिला 'हा' इशारा

पाकच्या पंतप्रधानांची घाबरगुंडी, काश्मीरसंदर्भात जिहाद्यांना दिला 'हा' इशारा

वारंवार हिंसक, आक्रमक विधानं करून तणाव निर्माण करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची घाबरगुंडी उडाल्याचं दिसत आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 19 सप्टेंबर : वारंवार हिंसक, आक्रमक विधानं करून तणाव निर्माण करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची घाबरगुंडी उडाल्याचं दिसत आहे. 'काश्मिरींना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचू नये, यासाठी काश्मीर खोऱ्यात जाऊ नका. नाहीतर भारत तुमच्याविरोधात कारवाई करेल', असा इशारा इमरान खान यांनी जिहाद्यांना दिला आहे. इमरान खान म्हणालेत की, 'सूडभावनेनं जर कोणी पाकिस्तानातून भारतात जाण्याचा प्रयत्न करत असेल... तर तो काश्मिरींसोबत अन्याय करणारा व्यक्ती ठरले. त्याला काश्मिरींचा शत्रू ठरवण्यात येईल'.

इमरान खान यांना भीती

भारताला काश्मीरमधील लोकांवर कारवाई करण्यासाठी फक्त कारणच हवं आहे, अशी वायफळ बडबड इमरान खान यांनी पुन्हा केली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील तोरखाम टर्मिनलच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. यावेळेस त्यांनी पुन्हा एका असा दावा केला की, काश्मीर मुद्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी भारताकडून पुन्हा खोटे आरोप केले जाण्याची शक्यता आहे.

(वाचा :VIDEO : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 'तेजस'मधून उड्डाण करून रचला इतिहास)

संयुक्त राष्ट्रात उपस्थित करणार मुद्दा

येत्या काही दिवसांत इमरान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट देखील घेणार आहेत. यावेळेस ते काश्मीरचा मुद्दादेखील उपस्थित करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

(वाचा :डाव उलटवणार, CM फडणवीसांविरोधात काँग्रेस देणार तगडा उमेदवार)

बिथरलेला पाकिस्तान

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान पूर्णतः बिथरला आहे. मोदी सरकारनं 5 ऑगस्ट रोजी कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक ताणले गेले आहेत. कलम 370चा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडून वारंवार उपस्थित करण्यात आला. मात्र पाकच्या पदरी नेहमी निराशाच पडली आहे.

(वाचा : मोठी बातमी! काश्मीर मुद्यावरून आता चीनकडूनही पाकिस्तानला दणका)

यातच आता पाकिस्तान सर्वात मोठा झटका मिळालाय. कारण पाकच्या कुरापतींची नेहमीच पाठराखण करणाऱ्या चीननं देखील आता साथ सोडल्याचं दिसत आहे. काश्मीर मुद्यावर चर्चा नाही. येत्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग एका अनौपचारिक संमेलनात भेटणार आहेत. पण या भेटीदरम्यान काश्मीर मुद्यावर कोणतीही चर्चा होणार नाही. चीनमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा करावी, हे पूर्णतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांच्यावर अवलंबून आहे. पुढील महिन्यात या दोघांची भेट होणार आहे.

स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांनी केलं उड्डाण, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 12:51 PM IST

ताज्या बातम्या