डोनाल्ड ट्रम्प यांची अणुबॉम्ब टाकण्याची इच्छा, 'हे' आहे कारण...

डोनाल्ड ट्रम्प यांची अणुबॉम्ब टाकण्याची इच्छा, 'हे' आहे कारण...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वादग्रस्त, चित्रविचित्र कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता चक्क अणुबॉम्ब टाकण्यावरून ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

  • Share this:

वॉशिंग्टन, 26 ऑगस्ट : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वादग्रस्त, चित्रविचित्र कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता चक्क अणुबॉम्ब टाकण्यावरून ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून जलद गतीनं अमेरिकेच्या दिशेनं पुढे सरकणाऱ्या तीव्र वादळाला रोखण्यासाठी ट्रम्प यांनी दुसरंतिसरं काही नाही तर थेट अणुबॉम्ब टाकण्याचाच सल्ला दिलाय. अमेरिकेपर्यंत हे भयानक वादळ पोहोचू नये, यासाठी ट्रम्प यांनी हा अजब सल्ला दिला आहे. 'Axios' वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प वादळाच्या परिस्थितीची माहिती घेत होते, यावेळेस त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना थेट अणुबॉम्ब टाकण्याचाच सल्ला दिला. अणुबॉम्ब फेकल्यास वादळ रोखलं जाण्याची शक्यता कितपत आहे? असा प्रश्न ट्रम्प यांनी आपल्या अधिकाऱ्यांना विचारला.

(वाचा : सोन्याची चाळीशी! ऐन सणासुदीच्या काळात गाठला दराचा उच्चांक)

वृत्तानुसार, अणुबॉम्ब फेकून वादळ रोखण्याचा अजब गजब सल्ला देण्याची ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेतील वैज्ञानिकांना यासंदर्भात संशोधन करण्यास सांगितलं होतं. जेणेकरून भविष्यात वादळामुळे अमेरिकेचं होणारं नुकसान रोखता येणं शक्य होईल.

Axios च्या वृत्तानुसार, अणुबॉम्ब फेकून वादळ रोखण्याचा सल्ला यापूर्वी एका वैज्ञानिकानं 34व्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात दिला होता. पण हा सल्ला योग्य आणि व्यावहारिक नसल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. दरम्यान, तीव्र वादळामुळे दरवर्षी अमेरिकेचं प्रचंड नुकसान होतं.

(वाचा: शिवसेनेची अडचण होणार? मित्रपक्षांच्या मदतीने भाजप सोडणार 'इतक्याच' जागा)

सावधान! तुम्ही भेसळयुक्त स्कॉच पिताय? पाहा SPECIAL REPORT

Published by: Akshay Shitole
First published: August 26, 2019, 12:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading