शहाबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार ?

शहाबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार ?

सूत्रांच्या माहितीनुसार नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शहाबाझ शरीफ हेच पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होऊ शकतात. ते सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जुलै : पनामा गेट प्रकरणी पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर नवाझ शरीफ यांना तात्काळ पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सूत्रांच्या माहितीनुसार नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शहाबाझ शरीफ हेच पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होऊ शकतात. ते सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत. शहाबाज 2013पासून पंजाब प्रांताचे मुख्यमंत्रीपद सांभाळताहेत याच अनुभवाच्या जोरावर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी त्यांची वर्णी लागू शकते. असे सुतोवाच वर्तवले जाताहेत.

पाकिस्तानमध्ये पुढच्या वर्षीच सार्वत्रिक निवडणुका होताहेत. त्यामुळे नव्या पंतप्रधानांना फक्त एक वर्षाचा कार्यकाल मिळणार आहे. दरम्यान, नवाश शरिफ पंतप्रधानपदावरून पायउतार होताच विरोधकांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला. त्यामुळे आगामी निवडणूक शरीफ कुटुंबियांना नक्कीच जड जाण्याची शक्यता आहे. नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. 1993साली त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे ते पंतप्रधानपदावरून पायउतार झाले होते. तर दुसऱ्या टर्ममध्ये म्हणजेच 1999साली परवेझ मुशर्रफ लष्करप्रमुख असताना त्यांनी शरीफांना पंतप्रधानपदावरून पदच्युत केलं होतं. आताही ते परदेशातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणीच दोषी ठरलेत. पनामा गेट नावाने हा घोटाळा काही शोध पत्रकारांनी उघडकीस आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...