मेजर सुलेमान 10 सेंकदात झाला ठार , 24 तासानंतर बाहेर आला थरारक VIDEO

मेजर सुलेमान 10 सेंकदात झाला ठार , 24 तासानंतर बाहेर आला थरारक VIDEO

अमेरिकेने इराकमधल्या आपल्या तळावरून क्षेपणास्त्र डागलं आणि त्याने नेमका सुलेमानीचा वेध घेतल्याचं त्या VIDEOमध्ये स्पष्ट दिसतंय.

  • Share this:

बगदाद 03 जानेवारी : अमेरिकेने केलेल्या रॉकेट हल्ल्यात इराकची राजधानी बगदादमध्ये इराणच्या कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाला. सुलेमानी त्याच्या फौजेसह बगदाद एअरपोर्टकडे जात होता नेमका त्याच वेळी अमेरिकेनं हवाई हल्ला केला. यात सुलेमानी ठार झाला. त्या हल्ल्याचा थरारक VIDEO आता बाहेर आलाय. अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी सुलेमानी ज्या ठिकाणी होता नेमका त्याच ठिकाणचा वेध घेतल्याचं त्यात स्पष्टपणे दिसून येतंय. अमेरिकेने इराकमधल्या आपल्या तळावरून क्षेपणास्त्र डागलं आणि त्याने नेमका सुलेमानीचा वेध घेतल्याचं त्या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय.

या हल्ल्यामध्ये पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सचा डेप्युटी कमांडर अबू महदी अल मुहांदिस हासुद्धा ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुलेमानी ठार झाल्याच्या वृत्ताला इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलनं दुजोरा दिला आहे. सुलेमानी पश्चिम आशियात इराणी कारवायांमागचा सूत्रधार मानला जातो. त्याने सिरियामध्ये जाळं पसरवलं होतं तसंच इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करण्याचाही आरोप त्याच्यावर होता. अमेरिका त्याच्या मागावर होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांनी सुलेमानी ठार झाल्यानंतर काही वेळातच अमेरिकेच्या झेंड्याचा फोटो ट्विट केला होता. गेल्या वर्षीपासून इराण-अमेरिका संघर्ष वाढला होता. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध घातले आहेत.

तो VIDEO VIRAL झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी मागितली माफी

इराणवर केलेल्या या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. इराणचे समर्थन करणाऱ्या काही गटांनी बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केल्यानतंर अमेरिकेनं हा हल्ला केला आहे. डोनाल़्ड ट्रम्प यांनी एक दिवस आधी याबाबत इशाराही दिला होता.

सुलेमानी इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी सैन्यातील शक्तिशाली अशा कुद्स फोर्सचा प्रमुख होता. त्याला आणण्यासाठी अल मुहांदिस गेला होता. सुलेमानीचे विमान लेबनानमधून आलं होतं. सुलेमानी विमानातून उतरला आणि मुहांदिसला भेटत असतानाच अमेरिकेनं रॉकेट हल्ला केला. यात 7 जण मारले गेले. सुलेमानीची ओळख त्याच्या हातात असलेल्या अंगठीवरून करण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय. यामुळे इराण आणि अमेरिकेमधला तणाव वाढला आहे.

First published: January 3, 2020, 9:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading