या देशात आहे सर्वात लहान सोन्याचं नाण, काय आहे वैशिष्ट्ये?

या देशात आहे सर्वात लहान सोन्याचं नाण, काय आहे वैशिष्ट्ये?

स्वित्झलँड सरकारनं जगातील सर्वात लहान सोन्याचा शिक्का तयार केला आहे. सोन्याचा शिक्का येवढा लहान आहे की ते पाहण्यासाठी मॅग्निफाईंग ग्लासचा (आवर्धक लेन्स) वापर करावा लागतो.

  • Share this:

स्वित्झलँड, 24 जानेवारी: तुम्ही आतापर्यंत अनेक वस्तूंचं विक्रम पाहिले असेल. कोणती वस्तू सर्वात लहान तर कोणती सर्वात मोठी असल्याचं तुम्ही ऐकलं आणि पाहिलं असेल. अनेक वस्तूंचे रेकॉर्डही झाल्याचं  तुम्ही पाहिले असेल. मात्र तुम्ही जगातील सर्वात लहान सोन्याचं नाण पाहिला नसेल. मात्र आता जगात सर्वात लहान सोन्याचं नाण तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सोन्याचं नाण  पाहण्यासाठी चक्क मॅग्निफाईंग ग्लासचा वापर करावा लागतो.

स्वित्झलँडमध्ये जगातील सर्वात लहान सोन्याचं नाण

स्वित्झलँडमध्ये जगातील सर्वात लहान सोन्याचं नाण तयार करण्यात आला आहे. हा सोन्याचं नाण पाहण्यासाठी चक्क मॅग्निफाईंग ग्लासचा वापर करावा लागतो. सोन्याच्या नाण्यांवर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा फोटो लावण्यात आला आहे. या फोटोत आईन्स्टाईन जीभ बाहेर काढताना दिसतात. गेल्या गुरुवारी सरकारनं या नाण्याविषयी जगाला माहिती दिली आहे. तसेच हे नाणं जगातील सर्वात लहान असल्याचा दावाही स्वित्झलँडकडून करण्यात आला आहे.

सोन्याच्या नाण्याची वैशिष्ट्ये काय?

जगात आता या सर्वात लहान सोन्याच्या नाण्याची चर्चा सुरू झाली आहे. हे नाणं दिसते तरी कसा हे पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ह्या नाण्याची अनेक वैशिष्ट्ये सुद्धा आहे. हे नाणं केवळ 0.12 इंच येवढाचं आहे. नाण्याचं वजन एक आऊसचा 500 वा हिस्सा आहे. ग्राममध्ये मोजमाप झाल्यास हे नाणं 0.063 ग्राम आहे. सोन्याच्या नाण्याची किंमत स्विझ फ्रँकचा चौथा भाग म्हणजे 0.26 डॉलर येवढा आहे. हे नाण ऑनलाईन ऑर्डरही करता येणार आहे.

एका नाण्याची किंमत किती?

सध्या सरकारनं सोन्याचे केवळ 999 नाणे तयार केले आहे. एक नाण खरेदी करण्यासाठी 199 स्विझ फ्रँक मोजावे लागणार आहे. भारतीय रुपयात या नाण्याची किंमत 14 हजार 624 रुपये आहे. नाण खरेदी करणाऱ्या लोकांना मॅग्निफाईंग ग्लास देण्यात येतो. यामुळं खरेदी करणाऱ्या लोकांना नाण्यासह आईन्स्टाईन यांचा फोटोही दिसणार आहे.

नाण्यावर आईन्स्टाईनचा फोटो का?

1879 साली दक्षिण जर्मनीत अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म झाला होता. त्यांनी 1905 साली E=mc² हा फॉर्फ्युला जगाला दिला. सरळ भाषेत याचा अर्थ कोणत्याही वस्तुच्या उर्जेविषयी माहिती करून घेण्यासाठी ह्या फॉर्म्युल्याची मदत होते. या सुत्रानुसार वस्तूच्या वजनाला त्याच्या गतीच्या वर्गानं गुणलं जातं. त्यामुळं आईन्स्टाईन यांचा फोटो नाण्यावर दाखवण्यात आला आहे.

First published: January 24, 2020, 5:51 PM IST

ताज्या बातम्या