या देशात तयार होतंय हिंदूंचं पाचवं धाम, 500 एकरात आहे मंदिर

या देशात तयार होतंय हिंदूंचं पाचवं धाम, 500 एकरात आहे मंदिर

जगातील हिंदू धर्मियांचं पाचवं धाम कंबोडियात तयार होणार आहे. लंडनमधील एक कंपनी हिंदू धर्माचं भव्य मंदिर तयार करणार आहे. आरएसएसनं हे भव्य मंदिर तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जानेवारी: हिंदू धर्मियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हिंदूंसाठी लवकरच पाचवं धाम तयार होणार आहे. मात्र हे पाचवं धाम भारतात नाही तर विदेशात तयार होतंय. कंबोडियात हिंदू धर्मियांसाठी पाचवं धाम सुरू होणार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघानं कंबोडियातील अंकोरवाट मंदिराला हिंदूंचं पाचवं तिर्थस्थळ करण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघासोबत मिळून लंडनमधील एक कंपनीनं भव्य मंदिर उभारणार असल्याची माहिती मिळतेय.

चार धामाला खास महत्त्व

हिंदू धर्मात चार धामाला खास महत्त्व आहे. भगवान विष्णू आणि भगवान शिव खास मित्र होते. त्यामुळं जिथे विष्णू वास करत होते त्यापासून काही अंतरावर शिव वास करतात.  त्यामुळं जिथं विष्णू तिथे शिव वास करतात. हर आणि हरी यांची ही जोडी चार धाममध्ये खास आहे. त्यामुळं चारही धाममध्ये विष्णू आणि शिव यांची जोडी दिसते. देशात चार धाम पूर्वेत जगन्नाथ पुरी, पश्चिमेला द्वारका, उत्तरेला बद्रीनाथ आणि दक्षिणेला रामेश्वर आहे. हे चार धाम हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातच आता कंबोडियात पाचवं धाम होणार असल्यानं हिंदू धर्मियांसाठी आनंदाची बाबा आहे.

वैष्णव पंथानं केले धाम निर्माण

देशातील चारही धाम वैष्णव पंथ असलेल्या लोकांनी तयार केली आहे. चारही धाम भगवान विष्णूचे मंदिर आहेत. विष्णूच्या मंदिराच्या जोडीला शिव मंदिर आहे. बद्रीनाथचा जोडीदार केदारनाथ, द्वारकाचा जोडीदार सोमनाथ, रामेश्वरचा जोडीदार रंगनाथ स्वामी मंदिर आणि जगन्नाथचा जोडीदार लिंगराज मंदिर आहे. हर आणि हरीची ही जोडीच या धामांना तिर्थधाम बनवते. मात्र काही भाविक अंकोरवाट धाम या चार धामांमध्ये बसते का असा सवाल विचारताहेत.

कसं आहे अंकोरवाट मंदिर?

कोंबोडियातील अंकोरवाट मंदिर प्राचीन हिंदू मंदिरापैकी एक आहे. जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर अशीही या मंदिराची ओळख आहे. अंदाजे 1113 ते 1150च्या दशकात ह्या हिंदू मंदिराची निर्मिती झाल्याचं सांगण्यात येतं. हे मंदिर 500 एकरमध्ये पसरलेलं आहे. अंकोरवाट या शब्दाचा अर्थ मंदिरांचं शहर असा होतो. अतिशय सुरेख असलेलं मंदिर भगवान विष्णूच्या मंदिराच्या रुपात तयार करण्यात आलं होतं. मात्र  14 व्या शतकात या मंदिराला बौध धर्माच्या मंदिराच्या स्वरुपात बदलण्यात आलं. मंदिरात भगवान बौद्धांची मूर्ती बसवण्यात आली. आता ही इमारत युनोस्कोच्या यादीत आहे.

कसं आहे अंकोर शहर ?

अंकोरवाट मंदिर अतिशय प्राचीन आहे. हे मंदिर 65 मीटर उंच आहे. ज्या शहरात हे मंदिर तयार करण्यात आलं आहे, त्या शहराचं नाव अंकोर आहे.  अनेक वर्षांपूर्वी अंकोर शहर खमेर शासनची राजधानी होती. शहरात आजही अनेक हिंदू मंदिरं आहे. मात्र विष्णू मदिराजवळ कुठेही शिव मंदिर नाही. अंकोरवाट जगातील सर्वात मोठं आणि विकसीत शहर असल्याचं बोललं जातंय. मात्र 14 व्या दशकात ह्या मंदिराला बौद्ध धर्माच्या मंदिराच्या रुपात ओळखलं जातंय. त्यामुळं शहराच्या गौरवशाली इतिहासाकडे पाहता या शहराला हिंदू धर्मियांचं पाचवं धाम म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळं पुढील काही वर्षात हिंदूंना पाचव्या धामचं दर्शन घेण्यासाठी कंबोडियात जावं लागणार आहे.

First published: January 26, 2020, 2:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading