'आई' या नावाला कलंक, स्वत:च्या मुलींचे अश्लील VIDEO बनवून विकणारी टोळी गजाआड

महिला ही 35 वर्षांची असून तिला दोन लहान मुली आहेत. त्यांचा वापर करत ही महिला त्या चिमुकलींचे अश्लील VIDEO तयार करत होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 10:46 PM IST

'आई' या नावाला कलंक, स्वत:च्या मुलींचे अश्लील VIDEO बनवून विकणारी टोळी गजाआड

मालगा 31 ऑक्टोंबर : कधी कुणाला काय दुर्बुद्धी सुचेल याचा काहीच नेम नाही. आई आणि मुलांचं नातं हे सगळ्यात पवित्र समजलं जातं. मुलांच्या आयुष्यात आईचं स्थान हे खर म्हणजे शब्दातच व्यक्त करू शकत नाही. मात्र आई या नावालाच कलंक लावणारी घटना स्पेनमध्ये घडलीय. या घटनेने खळबळ उडाली असून सगळ्यांनाच धक्का बसलाय. आपल्या लहान मुलींचे अश्लील VIDEO तयार करून ते ऑनलाईन विकणारी टोळी स्पॅनिश पोलिसांनी गजाआड केलीय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त झालं असून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत. असे VIDEO  तयार करून ते आंतरराष्ट्रीय बाजारात विकायचे आणि लाखो डॉलर्स कमवायचे असा धंदा या महिलांनी सुरू केला होता.

फक्त भारतावर नाही तर तुमच्यावर देखील हल्ला करू; पाक मंत्र्याची धमकी!

स्पेनच्या मालगा शहरात पोलिसांनी काही महिलांना  गुप्त माहितीच्या आधारे अटक केली. इंटरनेटवर लहान मुलांचे अश्लील VIDEO टाकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचा माग काढत पोलिसांनी दोन महिलांना अटक केली. त्या स्वीडनच्या नागरिक आहेत. महिलांच्या घरातून पोलिसांनी कॅमेऱ्यासह अनेक आक्षेपार्ह गोष्टी जप्त केल्या आहेत.

या महिलांनी अशा पद्धतीचं एक नेटवर्कच तयार केलं होतं. यातली एक महिला ही 35 वर्षांची असून तिला दोन लहान मुली आहेत. त्यांचा वापर करत ही महिला त्या चिमुकलींचे अश्लील VIDEO तयार करत होती. असे  VIDEO तयार करून ते ऑनलाईन विकायचे असा त्यांचा धंदा होता. अशा VIDEO नां बंदी असली तरी वेगवेगळ्या तांत्रिक क्लृप्त्या वापरून असे VIDEO  पोस्ट केले जातात असं पोलिसांचं म्हणणं आहे.

वर्षभरानंतर मुलगी सापडली तीदेखील पॉर्न साईटवर, आईनेच पाहिले फोटो आणि व्हिडिओ!

Loading...

या महिलांना अटक करून त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं असून त्यांना कोर्टाने सहा वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. स्वीडीश पोलिसांनी माहिती पुरविल्यावर स्पॅनिश पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. या महिलेने काही फोटो अपलोड केल्यानंतर पोलिसांना खात्री पटली आणि तिला तिच्या घरातूनच अटक केली. अन्य एक महिला फरार असून पोलीस तिचा शोध घेताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2019 10:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...