श्रीलंकेत अर्जून रणतुंगा यांच्या अपहरणाचा प्रयत्न, गोळीबारात एकाचा मृत्यू

श्रीलंकेची राजधानी असलेलं शहर कोलंबोमध्ये पेट्रोलिअम मंत्री अर्जून रणतुंगा यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2018 09:18 PM IST

श्रीलंकेत अर्जून रणतुंगा यांच्या अपहरणाचा प्रयत्न, गोळीबारात एकाचा मृत्यू

श्रीलंका, 28 ऑक्टोबर : श्रीलंकेत राजकीय भूकंपानंतर नाट्यमय घडामोडीने वेग आला आहे. कोलंबोमध्ये पेट्रोलिअम मंत्री अर्जून रणतुंगा यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर ३ जण जखमी झाले आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, रणतुंगा आपल्या सरकारी कार्यालयातून सिलोन पेट्रोल कॉर्पोरेशनमध्ये जात असताना त्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला. यादरम्यान अर्जून रणतुंगा यांच्या सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अर्जून रणतुंगा यांच्या एका सुरक्षारक्षकाला कोलंबो पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रपती सिरीसेना यांच्या समर्थकांनी रणतुंगा यांना जबरदस्ती सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारामध्ये तीन लोकं जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कोलंबो शहरामध्ये तणावाचे वातावरण झाले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

श्रीलंकेच्या संसद अध्यक्ष कारू जयसुर्या यांनी रानिल विक्रमसिंघ यांना देशाचे पंतप्रधान म्हणून मान्यता दिली आहे. परंतु, अजूनही तिथे राजकीय संघर्ष कायम आहे.  यूएनपी नेता विक्रमसिंघ यांना राष्ट्रपती मैत्रिपाला शिरीसेना यांनी पंतप्रधानपदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर  माजी राष्ट्रापती महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती.

VIDEO : बापरे!, एस्केलेटरमध्ये अडकला १० वर्षांच्या मुलाचा हात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2018 09:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...