न्यूयॉर्क 21 मार्च : कोरोनामुळे सर्व जगात दहशत पसरलीय. जगातले 100 पेक्षा जास्त देश कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यावर अजुन औषध सापडलं नसल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. जगभरात त्यावर संशोधनही सुरू आहे. तर जागतिक आरोग्य संघटना आणि विविध संशोधन संस्थांनी नागरिकांसाठी गाईडलाईन्स तयार केल्या आहेत. आजारी आणि 65 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना कोरोना होण्याची शक्यता जास्त असते. आत डॉक्टरांनी त्यात स्मोकिंग करणाऱ्यांचाही समावेश केला आहे.
स्मोकिंग करणं, ड्रग्जचं सेवन करणाऱ्यांना कोरोना होण्याचा जास्त धोका असल्याचं मत National Institute on Drug Abuse ते तज्ज्ञ डॉक्टर नोरा व्होकाव यांनी व्यक्त केलं. कोरोना व्हायरस हा पहिले प्रतिकारशक्ती कमी करतो आणि नंतर फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे रुग्णाला श्वास घ्यायला त्रास जातो.
जे स्मोकिंग करतात त्यांची फुफ्फुसं आधीच खराब झालेली असतात. त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यामुळे ते या व्हायरसचा हल्ला सहन करू शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना लवकर संसर्ग होण्याचा धोका असतो असं मतही डॉक्टरांनी व्यक्त केलंय. स्मोकिंग करणं हेच अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देणारं असतं. त्यात अशा काळात जर ते व्यसन सुरूच ठेवलं तर ते जीव घेणं ठरू शकतं असा इशाराही त्यांनी दिलाय.
AC मुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्रीइटलीत परिस्थिती गंभीर
इटलीमध्ये (Italy) कोरोनाव्हायरसने (Coronavirus) थैमान घातलं आहे. एकाच दिवसात तब्बल 627 जणांचा या महाभयंकर व्हायरसने बळी घेतला आहे.
जगभरात कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 11 हजारांवर पोहोचली आहे. आतापर्यंत सर्वाधिक मृतांचा आकडा हा चीनमध्ये होता. मात्र शुक्रवारपासून इटलीमध्ये मृतांची संख्या वाढली आहे. इटलीमध्ये 24 तासांत 627 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची संख्या 4032 वर पोहोचली आहे. हे प्रमाण चीनपेक्षाही जास्त आहे.
संतापजनक! हातावर स्टॅम्प मारल्यानंतरही कुलगुरूंनी केला मुंबई-पुणे प्रवास
सीएनएनच्या रिपोर्टनुसार लोमबार्डीतील आयसीयूमध्ये रुग्णांसाठी जागाच नाही. इथल्या रुग्णांना दुसऱ्या शहरातील रुग्णालयात पाठवलं जातं आहे. अनेक ठिकाणी तात्पुरते हॉस्पिटल्स उभारण्यात आलेत. इटलीने आपला लॉकडाऊन 3 एप्रिलपर्यंत वाढवला आहे.
जगभरात कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत 11 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपात हा आकडा 5 हजारांच्या वर गेला आहे.इटलीप्रमाणे फ्रान्स आणि जर्मनीमध्येही लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.