बापरे...दिवाळीच्या आधी सापडला 'मोती', वय वर्ष 8 हजार!

बापरे...दिवाळीच्या आधी  सापडला 'मोती', वय वर्ष 8 हजार!

30 ऑक्टोबरपासून एक ऐतिहासिक वस्तुंचं प्रदर्शन भरणार असून त्यात हा मोती ठेवण्यात येणार आहे.

  • Share this:

अबुधाबी 21 ऑक्टोंबर : मोत्याला जगभर किंमत आहे ती त्याच्या सौॆदयामुळे. दागिन्यांमध्ये त्याचा वापर मुक्तपणे करण्यात येतो. उंची सौंदर्य आणि खानदानी रुबाब हे त्याचं वैशिष्ट्य. भारतात दागिण्यांची आवड असल्यामुळे तर मोत्याला खासच महत्त्व आहे. जगभरात भारताच्या मोत्यांना वेगळी ओळख आहे. मोत्यांवर प्रेम करणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. अबु धाबी इंथ उत्खननात एक मोती सापडलाय. हा साधा सुधा मोती नसून तब्बल 8 हजार वर्ष तो जुना असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाने व्यक्त केलाय. नैसर्गिक असलेला हा मोती जगातला सर्वात जुना असल्याचा दावाही करण्यात येतोय. 30 ऑक्टोबरपासून अबुधाबीत एक ऐतिहासिक वस्तुंचं प्रदर्शन भरणार असून त्यात हा मोती ठेवण्यात येणार आहे.

Amazonचा सगळ्यात मोठा Diwali Sale उद्यापासून, Smart Phone वर जबरदस्त ऑफर

इथल्या मारवाह बेटावर सुरू असलेल्या उत्खननात हा मोती सापडला. एका मातीच्या गोळ्यात तज्ज्ञांना काहीतरी पांढरी छोटीशी वस्तू आढळून आली. ती स्वच्छ केल्यानंतर त्यांना तो मोती असल्याचं आढळून आलं. या मोत्याच्या कवचाचा प्रयोगशाळेत अभ्यास करण्यात आला तेव्हा त्याचं वय हे 8 हजार वर्ष जुनं असलं पाहिजे असा अंदाज तज्ज्ञांनी केलाय.

महाराष्ट्राच्या तरुणाचं स्वप्न पूर्ण होणार,थेट PM मोदींनी घालतं प्रकल्पात लक्ष

या उत्खननात Neolithic संस्कृतीचे पुरावे मिळाले आहे. त्या काळातल्या अनेक वस्तू, कपाटं, पलंग आणि अनेक ऐतिहासिक वस्तू मिळाल्या असून त्यामुळे त्या काळातल्या संस्कृतीचं दर्शन होतं. त्याकाळातही लोकांना दागिने आवडत होते. त्यातून त्यांची संस्कृती आणि इतिहास कळतो असा दावाही करण्यात येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2019 11:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading