अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहता येणार, 'या' मुस्लिम देशाचा क्रांतिकारी निर्णय

अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहता येणार, 'या' मुस्लिम देशाचा क्रांतिकारी निर्णय

अविवाहित महिलांनाही आता एकट्याने रुम्स बुक करता येणार आहेत. याआधी एकट्या अविवाहित महिलांना रुम्स मिळत नव्हत्या. दारू पिण्यावर मात्र कडक निर्बंध अजुनही कायम ठेवण्यात आले आहेत.

  • Share this:

रियाध, 07 ऑक्टोंबर :  सौदी अरेबीयात महिलांवर अनेक प्रतिबंध आहेत. मात्र आता महिलांवरच्या निर्बधांमध्ये अनेक बदल करण्यात आले येत आहेत. सौदीत युवराज मोहम्मद बिन-सलमान  यांच्या हाती सर्व कारभार आल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी देशात अनेक बदल केलेत. त्यातले सर्वात लक्षवेधी बदल म्हणजे महिलांना मिळत असलेले विविध अधिकार. आता पर्यटन वाढविण्यासाठी त्यांनी अनेक निर्णयांची घोषणा केलीय. अतिशय कर्मठ मुस्लिम देश म्हणून ओळख असणाऱ्या सौदी अरेबियाच्या दृष्टीने हे निर्णय क्रांतिकारी समजले जातात. आत्तापर्यंत सौदीत अविवाहित विदेशी जोडप्यांना हॉटेलमध्ये रुम बुक करण्याची परनागी नव्हती. ज्यांना हॉटेलमध्ये जागा पाहिजे आहे अशा जोडप्यांना लग्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागत होतं.

वाचा- 'युती'ला धडा शिकविण्यासाठी 'मनसे' राष्ट्रवादीची छुपी खेळी!

मात्र आता हे निर्बंध शिथील करण्यात आले असून अविवाहित विदेशी जोडप्यांना हॉटेल्समध्ये रुम बुक करत एकत्र राहता येणार आहे. तसच अविवाहित महिलांनाही आता एकट्याने रुम्स बुक करता येणार आहेत. याआधी एकट्या अविवाहित महिलांना रुम्स मिळत नव्हत्या. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सौदीच्या पर्यटनंत्रालयाने जाहीर केलंय. सौदीचे युवराज मोहम्मद बिन-सलमान यांनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर महिलांसाठी अनेक निर्णय घेतले होते. महिलांना चित्रपटगृहात जाण्याची परवानगी, ड्रायव्हिंग करण्याची परवानगी देण्यात आली होती. दारू पिण्यावर मात्र कडक निर्बंध अजुनही कायम ठेवण्यात आले आहेत.

वाचा-  आई आमदार व्हावी म्हणून मुलाने घेतली रिंगणातून माघार!

तसच त्या फुटबॉल स्टेडियममध्ये त्या आता उपस्थितही राहू शकतात. जगातला सर्वात मोठा तेल उत्पादक देश म्हणून सौदीची ओळख आहे. मात्र प्रदुषण आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे जगभरातले विकसीत देश तेलाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करताहेत. इलेक्ट्रॉनिक गाड्यांचा विकास झापाट्याने होत असून काही वर्षात स्वस्तात अशा गाड्या बाजारात येणार आहेत. त्यातच जमिनीतलं तेल हे कधीतरी संपणारं आहे याची जाणीव सौदीला झाल्याने अर्थव्यवस्था तेलाबरोबरच इतर गोष्टींवरही अवलंबून असावी या विचाराने त्यांनी पर्यटन क्षेत्राला चालना देण्याचा निर्णय घेतलाय.

First published: October 7, 2019, 4:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading