अमेरिकेत पहिल्यांदाच 2 मुस्लिम महिला निवडणूक जिंकल्या!

डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार राशिदा तालिब आणि इल्हान उमर यूएस काँग्रेससाठी जिंकल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2018 11:18 PM IST

अमेरिकेत पहिल्यांदाच 2 मुस्लिम महिला निवडणूक जिंकल्या!04 नोव्हेंबर : अमेरिका निवडणुकीच्या इतिहास घडला. मध्यावधी निवडणुकीत पहिल्यांदाच दोन मुस्लिम महिला निवडून आल्या आहेत. डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार राशिदा तालिब आणि इल्हान उमर यूएस काँग्रेससाठी जिंकल्या आहेत. याशिवाय २७ वर्षीय साफिया वजीर यांची हाऊस ऑफ रिप्रेजेंटेव्हिवसाठी निवड झाली आहे.


राशिदा तालिब यांनी मिशिगन येथून विजय मिळवला आहे. तर इल्हान उमर यांनी मिनेसोटामधून बाजी मारली आहे. याआधी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार राशिदा यांनी मिशिगनमधून जूनियर्स जॉन कान्यर्स यांना पराभूत करून जागेवर दावा केला होता.

Loading...


कोण आहे राशिदा आणि इल्हान ?


४२ वर्षीय राशिदा तालिब या मुळच्या फिलिस्तानच्या आहे.

तर इल्हान या सोमालिया येथील आहे. इल्हान उमर यांच्या कुटुंबाने १९९१ साली सोमालिया सोडून दिलं. त्यानंतर जवळपास चा वर्ष त्यांचं कुटुंब हे केनियामध्ये शरणार्थी शिबिरात राहत होतं. त्यानंतर त्यांचं कुटुंब हे अमेरिकेत स्थायिक झालं. दोन्ही महिलांनी इस्राईल फिलिस्तान वादावर आपली रोखठोक भूमिका मांडत होत्या. त्यामुळे त्या नेहमी चर्चेत राहत होत्या. राशिदा तालिब अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची टीकाकार आहे. दोन वर्षांपूर्वी भाषणात व्यत्यय आणल्यामुळे त्यांना अटक झाली होती.


कोण आहे साफिया वजीर ?


27 वर्षीय साफिया वजीर दोन मुलांची आई आहे. साफिया यांचं कुटुंब १९९७ मध्ये तालिबानमधून पळून आलं होतं त्यावेळी त्यांचं वय हे ६ वर्ष होतं. अमेरिकेत येण्याआधी त्यांचं कुटुंब १० वर्ष उजबेकिस्तानमध्ये राहत होतं. साफियाने अनेक दिवस वाॅलमार्टमध्ये काम केलं आहे.


मध्यावधी निवडणुकीचं महत्व


अमेरिकेच्या हाऊस आॅफ रिप्रेजेंव्हेटिव्स आणि सिनेट म्हणजे काँग्रेससाठी झालेल्या या निवडणुकीचे परिणाम ट्रम्प कार्यालयावर पडणार आहे. पुढील दोन वर्ष राजकीय वातावरण यामुळे प्रभावीत होईल. अमेरिकेतील या मध्यावधी निवडणुकीवर अवघ्या जगाचे लक्ष्य लागून होते. गेल्या ५० वर्षांच्या काळात पहिल्यांदाच यावेळी सर्वात जास्त मतदान झालं.


============================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2018 11:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...