Home /News /news /

काश्मीर मुद्द्यावर इम्रान खान यांची वेगळी खेळी, जनतेला दिले एकत्र येण्याचं आवाहन

काश्मीर मुद्द्यावर इम्रान खान यांची वेगळी खेळी, जनतेला दिले एकत्र येण्याचं आवाहन

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नावर वेगळा राग आवळल्याचं दिसतंय. 5 फेब्रुवारीला पाकिस्तानात काश्मीर प्रश्नी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तसं ट्विटच त्यांनी पाकिस्तानी जनतेला केलं आहे.

    कराची,26 जानेवारी: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मनात काय आहे, याचा थांगपत्ता लागत नाहीये. कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतासोबत संबंध सुधारण्यावर भर दिला होता. तर पाकिस्तानी दहशताद्याच्या दबावाखाली असल्याचंही ते दिसतात. आता तर त्यांनी काश्मिरी लोकांच्या हितासाठी 5 फेब्रुवारीला एकत्र येण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. 5 फेब्रुवारीला काश्मिरसाठी एकत्र या युनोच्या सुरक्षा परिषदेत भारताविरोधात काश्मीर प्रश्नावर चर्चा घडवून आणण्यास पाकिस्तानला अपयश आलं. त्यामुळं निराश झालेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता भारताविरोधात वेगळी रणनीती आखताहेत. त्यामुळं काश्मिरी लोकांच्या हितासाठी 5 फेब्रुवारीला पाकिस्तानी जनतेनं रस्त्यावर उतरण्याचं आवाहान इम्रान खान यांनी केलं आहे. पाकिस्तानात 5 फेब्रवारी काश्मीर दिवस म्हणून साजरा केला जातो. एकीकडे इम्रान खान हे पाकिस्तानच्या आर्थिक प्रगतीसाठी भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्यावर भर देतात. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या दबावाखाली असल्याचंही दिसतात. इम्रान खान यांचं पाकिस्तानी जनतेला आवाहन काश्मिरी जनतेसाठी एकत्र येण्याचं आवाहन पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेला केलं आहे. तसं ट्विटच इम्रान खान यांनी केलं आहे. मोदी सरकारवर जातीयवादी असल्याचा आरोप करत इम्रान खान यांनी ट्विट केलं आहे. काश्मीरमधील 80 लाख लोकांसाठी पाकिस्तान आणि जगातील लोकांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. काश्मीरमध्ये मोदी सरकारच्या 9 लाख जवानांच्या दबावाखाली काश्मीरी जतना जगत असल्याचा आरोप त्यांनी ट्विटवरून केला आहे. या आधीही इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेला काश्मिरी जनतेच्या समर्थनार्थ एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्याचं आवाहन या आधी इम्रान खान यांनी भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आवाहन केलं होतं. पाकिस्तान आणि भारताचे संबंध सुरळीत आणि चांगले होतील तेव्हा जगाला दोन्ही देशाच्या क्षमतेचा अंदाज येणार असल्याचं इम्रान खान यांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं. शांती आणि स्थिरतेशिवाय आर्थिक विकास शक्य नसल्याचं जागतिक कार्यक्रमात बोलताना इम्रान खान यांनी सांगितलं होतं. UNमध्ये दोन वेळा आपटला पाकिस्तान इम्रान खान यांनी मागील वर्षी एकदा नव्हे तर दोनवेळा काश्मीरचा मुद्दा युनोमध्ये उपस्थित केला. मात्र दोन्ही वेळा पाकिस्तान तोंडावर आपटला आहे. 2019 साली तर इम्रान खान यानं चीनच्या मदतीनं युनोच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. न्यूयॉर्कमध्ये युनोच्या झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्न हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याचं मान्य करण्यास युनोच्या सुरक्षा परिषदेनं नकार दिला. चीन शिवाय काश्मीर प्रश्नावर कोणत्याही देशानं पाकिस्तानचं समर्थन केलं नाही. फ्रान्स आणि अमेरिकेनं तर भारताचं खुलेआम समर्थन केलं. त्यामुळं पाकिस्तान आणि चीनचं तोंड पोळलं. इम्रान खान यांनी भारताला युद्धाची दिली होती धमकी काश्मीरमधून आर्टिकल 370 हटवल्यानं पाकिस्तानच्या पायाखालील जमीन सरकली. त्यामुळं जळफळाट झालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धाची धमकी सुद्धा दिली होती. मात्र केलं काहीच नाही. त्यामुळं पाकिस्तानची भारताला दिलेली धमकी ही पोकळचं ठरली. इम्रान खान त्यांचा पक्ष तहरीक ए- इन्साफ पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इम्रान खान यांना महत्त्व दिलं नाही. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांना सौदी अरेबियात मोदींचा सर्वात मोठा सन्मान झाला. काश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय मंचावर पाकला समर्थन नाही काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानकडून गरळ ओकली जातेय. पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्री काश्मीर प्रश्ननावर भारताविरोधात बोलत असतात. त्यांनी काश्मीर प्रश्नावर जगातील राष्ट्रांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र चीन शिवाय पाकिस्तानला कोणत्याही देशानं समर्थन दिलं नाही. त्यामुळं भारताविरोधात काश्मीर प्रश्नावर पाकिस्तान एकटा पडला आहे. असं असताना आता इम्रान खान यानं काश्मीर प्रश्नावर वेगळा राग आवळला आहे. 5 फेब्रुवारीला काश्मिरी लोकांसाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी पाकिस्तानी जनतेला केलं आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या