News18 Lokmat

ISI ने रचला POK पंतप्रधानांच्या हत्येचा कट, त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं?

त्या हेलिकॉप्टरमध्ये पाक व्याप्त काश्मिरचे पंतप्रधान रजा फारूख हैदर होते आणि त्यांच्या हत्येचा कट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ने रचला होता अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2018 06:57 PM IST

ISI ने रचला POK पंतप्रधानांच्या हत्येचा कट, त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं?

नवी दिल्ली, ता. 30 सप्टेंबर : भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरला भारतीय लष्कराने पिटाळून लावलं. या हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पाक व्याप्त काश्मिरचे पंतप्रधान रजा फारूख हैदर होते आणि त्यांच्या हत्येचा कट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ने रचला होता अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय. तर हे हेलिकॉप्टर चुकून भारतीय हद्दीत असल्याचं पाकिस्तानने म्हटलंय.

रविवारी दुपारी पाकिस्तानचं एक हेलिकॉप्टर जम्मू आणि काश्मिरच्या पुंछ जिल्ह्यात आढळून आलं. भारतीय सीमेच्या आत पांढऱ्या रंगाचं हे हेलिकॉप्टर दुपारी 12.13 वाजता आढळून आलं. हेलिकॉप्टर आढळून येताच लष्कराने हेलिकॉप्टरवर जोरदार गोळीबार केला. त्यानंतर ते तातडीनं माघारी फिरलं.

पाक व्याप्त काश्मिरचे पंतप्रधान रजा फारूख हैदर

पाक व्याप्त काश्मिरचे पंतप्रधान रजा फारूख हैदर

या हेलिकॉप्टरमध्ये पाक व्याप्त काश्मिरचे पंतप्रधान रजा फारूख हैदर होते. पाकिस्तानच्या एटीएस ने हेलिकॉप्टरला चुकीची दिशा दाखवली त्यामुळे ते भारतीय हद्दीत आलं असं म्हटलं जातंय. कुठल्याही देशाचं हेलिकॉप्टर दुसऱ्या देशाच्या हद्दीत आलं तर ते लष्कराकडून पाडलं जावू शकतं.

Loading...

त्यामुळं लष्करानं कारवाई केली तर ते हेलिकॉप्टर पाडलं जाईल आणि त्यात हैदर यांचा मृत्यू होईल असा डाव असू शकतो अशी शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केलीय.  हा भाग अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे हवाई नियंत्रण करणारी यंत्रणा एटीएस अशी चूक करणार नाही.

ही चूक नाही तर मुद्दाम हेतूपरस्पर करण्यात आलेली कृती होती असंही म्हटलं जातंय. पाक व्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अनधिकृत ताबा असून तो भाग भारताचाच असल्याचा आपला दावा आहे. तिथलं सरकार आणि पाकिस्तान सरकारमध्ये नेहमी शितयुद्ध सुरू असतं. अशा पार्श्वभूमीवर ISI चा डाव असू शकतो अशी शक्यताही व्यक्त करण्यात येतेय.

 

पाकिस्तानचं हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत, लष्कराचा गोळीबार : पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2018 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...