Elec-widget

माकडाने केली Online शॉपिंग; मालकाचा खिसा झाला खाली, VIDEO व्हायरल

माकडाने केली Online  शॉपिंग; मालकाचा खिसा झाला खाली, VIDEO व्हायरल

मेंगमेंग जेव्हा बाहेर आल्यात तेव्हा त्यांना मोबाईलवर ऑर्डर फ्लॅश होतांना दिली. त्यामुळे त्याही बुचकळ्यात पडल्या.

  • Share this:

बीजिंग14 नोव्हेंबर : Online  शॉपिंग हे आता काही नवं राहिलं नाही. मेट्रोसिटीत राहणाऱ्या प्रत्येकाचा कल हा Online  शॉपिंगकडेच असतो. पण चीनमध्ये एका माकडाने Online  शॉपिंग केलं असं तुम्हाला सांगितलं तर ते खरं वाटणार नाही. मात्र ही गोष्टी अगदी खरी असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. माकडाची मालकीन स्वयंपाक घरात असतानाच तिच्या मोबाईलवरून या माकडाने हा प्रताप केला आणि मालकाच्या खिशाला कात्री बसली.चीनच्या चॉग्झोउ प्रांतातली ही  घटना आहे. हे माकड पाळतू असून मेंगमेंग असं तिच्या मालकिनीचं नावं आहे. मेंगमेंग घरामध्ये कायम या माकडाला सोबत घेत आपली कामं करत असते. प्रचंड चुळबुळं असलेलं हे माकड आपल्या मालकीचं कायम निरिक्षण करत असे. त्यातूनच तो मोबाईल खेळायलाही शिकला होता.

बापरे... 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला सहा वर्षांचा मुलगा

या मालकीन बाई घरात दुसरीकडे गेल्या की तिचा फोन माकडाने घेतलाच म्हणून समजा. एकदा जेवण बनविण्यासाठी  मेंगमेंग या स्वयंपाकघरात होत्या. आणि त्यांचा हा लाडका हॉलमध्ये खेळत होता. त्याला बाईसाहेबांचा माबाईल दिसला आणि त्याने खेळता खेळता किराना सामानाची ऑर्डरही देवून टाकली.

VIDEO ... आणि सलमान खानच्या तोंडातून निघाली आग!

मेंगमेंग जेव्हा बाहेर आल्यात तेव्हा त्यांना मोबाईलवर ऑर्डर फ्लॅश होतांना दिली. त्यामुळे त्याही बुचकळ्यात पडल्या. त्यांनी जेव्हा CCTVचं फुटेज बघितलं तेव्हा त्यांना सगळा उलगडा झाला. स्वयंपाक घरात जाण्याआधी त्यांनी सगळं सामान ऑर्डर करून आपल्या कार्टमध्ये टाकलं होतं. या पठ्ठ्याने ऑर्डरचं बटन दाबलं आणि सामानाची ऑर्डर दिली गेली. जे नको होतं तेही सामान त्यांना घ्यावं लागलं आणि त्याचं भलं मोठं बिलंही द्यावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2019 04:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...