इम्रान खान यांची भाषा बदलली, म्हणाले, आम्ही भारतावर हल्ला करणार नाही

इम्रान खान यांची भाषा बदलली, म्हणाले, आम्ही भारतावर हल्ला करणार नाही

काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी युद्ध हा पर्याय असूच शकत नाही. पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी नाही.

  • Share this:

न्यूयॉर्क , 25 सप्टेंबर :  गेल्या काही महिन्यांपासून भारताबद्दल आक्रमक भाषा बोलणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान(Imran Khan) खान यांची भाषा आता बदलली आहे. ते नरमाईचा सूर लावत असून भारतावर(India) हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तान (Pakistan)करणार नाही, तो काही पर्याय असू शकत नाही असंही ते म्हणाले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. संयुक्त राष्ट्राच्या(UNGA) आमसभेत भाषणासाठी इम्रान खान हे सुद्धा न्यूयॉर्कमध्ये असून भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत नाहीये त्यामुळेही खान यांनी हतबलता व्यक्त केलीय.

मुख्यमंत्र्यांचा आदेश,'दुसरं लग्न केल्यास हिंदू पुरुषांवरही पोलीस कारवाई करा'

भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानातले अनेक नेते दररोज भारताला धमक्या देत आहेत. इम्रान खान यांनी तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन भाषणं दिली आणि भारताला अणूयुद्धाचीही धमकी दिली. अनेक मुलाखतींमध्येही त्यांनी युद्धखोरीचा भाषा वापरली. अशी भाषा वापरली की जगाचं लक्ष आपल्याकडे जाईल अशी त्यांची आशा होती. मात्र पाकिस्तानचं हे धोरण पूर्णपणे फसलं असून त्यांच्या धमक्यांना कुणीही भीक घालत नसल्याने पाकिस्तानचा जळफळाट होतोय.

Amazon, Filpkart वर धमाकेदार ऑफर्स! 'या' वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काऊंट

काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तानला एकाही देशाने समर्थन दिलेलं नाही. पाकिस्तानचे मित्र देश समजले जाणाऱ्या सौदी अरेबियाने आणि चीननेही पाकिस्तानला खुलेपणाने समर्थन दिलेलं नाही. जगाने पाकिस्तानचं म्हणणं ऐकलं नाही त्यामुळे मी निराश झालोय असंही इम्रान खान यांनी म्हटलं. ते म्हणाले, युरोपातले काही लाख लोकांना किंवा अमेरिकेच्या केवळ 8 लोकांना जरी नजरकैदेत ठेवलं असतं तर त्यांची हीच प्रतिक्रिया राहिली नसती.

पाकच्या पत्रकारांची इज्जत काढल्यानंतर भारतीय पत्रकारांबद्दल ट्रम्प काय म्हणाले?

काश्मीरच्या लोकांचं मत जर ऐकून घेतलं गेलं नाही तर मोठं संकट निर्माण होईल असा इशाराही त्यांनी दिला. संयुक्त राष्ट्राच्या आमसमभेला इम्रान खान 27 सप्टेंबरला संबोधीत करणार असून त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीही संबोधीत करणार आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 25, 2019, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading