कंगाल पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट, आता नवीन 15 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्याच्या तयारीत

कंगाल पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट, आता नवीन 15 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्याच्या तयारीत

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार, कर्ज घेण्याचा नवा रेकॉर्ड बनवणार आहेत. पाकिस्तान सरकार चालू आर्थिक वर्षामध्ये 15 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्याची योजना आखत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जून : भारताचा शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिघडू लागली आहे. पाकिस्तानसमोरील आर्थिक समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार, कर्ज घेण्याचा नवा रेकॉर्ड बनवणार आहेत. पाकिस्तान सरकार विदेश कर्जाचे देय आणि विदेशी मुद्रा भांडार (Pak Foreign Currency Reserve) मजबूत करण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये 15 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्याची योजना आखत आहे. एका वर्षातील हे दुसरं प्रकरण असेल की पाकिस्तान सरकार सर्वात जास्त कर्ज घेत आहे.

कुठे खर्च करणार 15 अब्ज डॉलर?

पाकिस्तानातील एक वृत्तपत्र 'द एक्सप्रेस ट्रिब्युन'ने पाकिस्तानी अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती दिली आहे की, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सरकार 15 अब्ज डॉलरचे कर्ज घेणार आहे. यापैकी 10 अब्ज डॉलर आधी घेतलेल्या कर्जाच्या मॅच्यूरिटीवर देय देण्यासाठी करण्यात येणार आहे. अहवालात सांगितले आहे की, ही रक्कम देय व्याजापेक्षा अधिक आहे. उर्वरित रक्कम देशाच्या सार्वजनिक कर्जाचा हिस्सा बनेल. यावर्षी मार्चच्या शेवटापर्यंत ही सार्वजनिक कर्जाची रक्कम वाढून 86.4 अब्ज डॉलर झाली आहे.

IMF ने दिले 1.39 अब्ज डॉलरचे कर्ज

कोरोना व्हायरसच्या संकटाशी लढण्यासाठी याआधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडे (IMF - International Monetary Fund) मदतीची मागणी केली होती. त्यांनतर IMF ने पाकिस्तानला 1.39 अब्ज डॉलरचे कर्ज दिले होते. पाकिस्तानला ही रक्कम देखील मिळाली आहे. एका वर्षात 15 अब्ज डॉलरचे कर्ज घेणं पाकिस्तानची आर्थिक स्थिती किती वाईट झाली आहे, हे दर्शवते.  इम्रान खान सरकार कर्जाच्या जाळ्यामध्ये फसत चालली आहे. पाकिस्तानमधील आधीच्या सरकारप्रमाणेच इम्रान खान यांचे 'पाकिस्तान-तहरीक-ए-इंसाफ' सरकार देखील निर्यात आणि विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यामध्ये अपयशी ठरले आहे. सरकारने घेतलेले कर्ज होण्याऐवजी वाढत चालले आहे.

पाकिस्तानने जुलै 2018 ते जून 2021 या कालावधीमध्ये 40 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे. यावरून पाकिस्तानच्या वाढणाऱ्या कर्जाचा अंदाज लावता येईल. यातील 27 अब्ज डॉलरचा वापर जुने कर्ज  फेडण्यासाठी करण्यात येणार आहे तर 13 अब्ज डॉलरला सार्वजनिक कर्जामध्ये जोडण्यात येणार आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: June 2, 2020, 8:46 AM IST
Tags: imran khan

ताज्या बातम्या