VIDEO पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री TVवर अँकरशी भांड भांड भांडले!

VIDEO पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री TVवर अँकरशी भांड भांड भांडले!

काश्मीरचा मुद्दा जगाच्या व्यासपीठावर नेण्याच्या वल्गना पंतप्रधान इम्रान खान यांनी केल्या होत्या. पण त्यात यश न आल्याने त्यांना निराश व्हावं लागलं.

  • Share this:

इस्लामाबाद 03 ऑक्टोंबर : काश्मीरच्या प्रश्नावरून सर्व जगभर भारताविरुद्ध अपप्रचार करण्याचा पाकिस्तानचा डाव त्यांच्याच अंगलट आलाय. जगातल्या कुठल्याही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानला जोरदार चपराक बसलीय. संयुक्त राष्ट्रासह सर्वच व्यासपीठांवर पाकिस्तानने हा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांच्या हाती काहीही लागलं नाही. काश्मीरचा मुद्दा जगाच्या व्यासपीठावर नेण्याच्या वल्गना पंतप्रधान इम्रान खान यांनी केल्या होत्या. पण त्यात यश न आल्याने त्यांना निराश व्हावं लागलं. याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानी नेत्यांना देशांतर्गत रोषालाही सामोरे जावं लागतंय. त्यामुळे पाकिस्तानचे नेते बिथरले असून परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी एका TV शोमध्ये अँकरशीच जोरदार भांडण केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

लंडनच्या कोर्टाचा पाकला मोठा झटका; निजामाचा खजिना भारतात येण्याचा मार्ग मोकळा

पाकिस्तानच्या एक्सप्रेस न्यूज या चॅनवरच्या एका कार्यक्रमात अँकर जावेद चौधरी यांनी कुरेशी यांना एका ट्विटवरून प्रश्न विचारला. काश्मीर प्रश्नावरून संयुक्त राष्ट्रात 58 देशांनी पाठिंबा दिला असं ट्विट इम्रान खान यांनी केलं होतं त्यावर प्रश्न विचारताच कुरेशी हे भडकले. असं ट्विट कुणीही केलं नाही, असं काही ट्विट केलं असेल तर दाखवा असं आव्हानच त्यांनी अँकरला दिलं आणि भांडण केलं. लाईव्ह शोमध्येच परराष्ट्रमंत्र्यांसारखा जबाबदार नेता भांडत असल्यानं त्यांच्यावर टीका केली जातेय.

पंतप्रधानांनी केला गैरव्यवहार; महिला पत्रकाराच्या आरोपाने खळबळ

त्यानंतर अँकरने त्या ट्विटचा कागदच त्यांच्या पुढे ठेवला त्यानंतर कुरेशी एकदम शांत झाले. मानवाधीकार परिषदेत अनेक देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचं सांगत त्या दावाव्यावर आपण कायम आहोत असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 04:55 PM IST

ताज्या बातम्या