रॅम्प वॉक करणाऱ्या पाकिस्तानी मॉडेलची सँडल तुटली, नंतर जे काही झालं ते तुम्हीच पाहा VIDEO

एवढच नाही तर त्याने खाली वाकत तिच्या पायातली सँडल काढायलाही तिला मदत केली.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 09:54 PM IST

रॅम्प वॉक करणाऱ्या पाकिस्तानी मॉडेलची सँडल तुटली, नंतर जे काही झालं ते तुम्हीच पाहा VIDEO

लाहोर 31 ऑक्टोंबर : पाकिस्तानात (Pakistan) फॅशन वीक होतो असं सांगितलं तर अनेकांना खरं वाटणार नाही. मात्र पाकिस्तानात गेल्या काही वर्षात फॅशन वीक होतो आणि त्याला प्रतिसादही चांगलाय मिळतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या फॅशन पाकिस्तान वीक मध्ये जे काही घडलं त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका महिला मॉडेलला पडताना तिचा साथीदार असलेल्या पुरूष मॉडेलने पडता पडता वाचवलं. सोशल मीडियावर हा VIDEO सध्या व्हायरल होत असून त्या पुरूष मॉडेलचं लोक जाम कौतुक करताहेत.

त्याचं झालं असं की, पाकिस्तान फॅशन वीकच्या तीसऱ्या दिवशी केशा सिद्दिकी (Kesha Siddique) ही मॉडेल रॅम्प वॉक करत होती. त्यावेळी तिचा साथिदार होता सुभान अवान (Subhan Awan)  केशा चालत असताना तिची उंच टाचांची सँडल अचानक तुटली आणि ती अडखळी. त्यावेली सुभानने तिला लगेच सावरलं आणि आधार दिला.

एवढच नाही तर त्याने खाली वाकत तिच्या पायातली सँडल काढायलाही तिला मदत केली. आणि त्या सँडल घेऊनच त्याने रॅम्प वॉक पूर्ण केला. सुभानच्या या सौजन्याने तिथे उपस्थित असलेल्या सर्वच प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. सगळ्यांनी उभं राहून त्याचं कौतुक केलं. तर केशाने  पायात काहीच न घालता तो रॅम्प वॉक पूर्ण केला. रॅम्प वॉकवरची केशा-सुभानची ही केमेस्ट्री सगळ्यांनाच खूप आवडली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2019 09:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...