नासात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्याची कमाल, शोधला दोन सूर्य असलेला ग्रह!

नासात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्याची कमाल, शोधला दोन सूर्य असलेला ग्रह!

नासात इंटर्नशीप करणाऱ्या एका 17 वर्षाच्या विद्यार्थ्यानं चक्क दोन सूर्य असलेल्या ग्रहाचा शोध लावला आहे. नेप्च्यून आणि सॅटर्न ग्रहाच्या आकारा एवढा या ग्रहाचा आकार असल्याची माहिती मिळतेय.

  • Share this:

नासा, 12 जानेवारी: नासात इंटर्नशीप करणाऱ्या एका विद्यार्थानं मोठा शोध लावलाय. त्यानं चक्क एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे, या ग्रहात दोन सूर्य आहे. या नव्या ग्रहाचं  नाव T0I 1388B ठेवण्यात आलंय. या नव्या ग्रहाचा आकार नेप्च्युन आणि सॅटर्न ग्रहा एवढा असल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे. नव्या ग्रहाचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा ग्रह दोन ताऱ्यांची परिक्रमा करतो.

नासाच्या ट्रान्सिटिंग एक्सोप्लेनेट सर्वे सॅटेलाईट मिशनला अनेक ग्रहांचा शोध लावण्याचं श्रेय देण्यात येते.आता या यादीत आणखी एका ग्रहाची भर पडली आहे. शोधण्यात आलेला ग्रह हा सौर मंडळापासून खूप दूर आहे. ह्या ग्रहाचा शोध लावणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव वुल्फा कुकीयर असं आहे.

कसा लागला नव्या ग्रहाचा शोध?

नासातील गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये ट्रेनी म्हणून वुल्फ कुकीर काही दिवसांपासून काम करत होता. इंटर्नशिपच्या तिसऱ्याचं दिवशी काम करत असताना T0I 1338B या सिस्टिममधून संदेश मिळाला. या संदेशावरून मी त्याचा अभ्यास केला मला सुरुवातील वाटलं हा एक स्थिर ग्रह आहे. पण तो एक ग्रह निघाला. त्या ग्रहात दोन सूर्य असल्याचं समोर आलं. वुल्फ याला पिक्टर नावाच्या सौरमंडळामध्ये दोन तारे परिक्रमा करताना दिसले. हे तारे पृथ्वीपासून सुमारे 1,300 प्रकाश वर्ष दूर आहे. यातील एक तारा सुर्यापेक्षा 15 टक्के मोठा आहे. तर दुसरा तारा हा खूप लहान आहे.

काय आहे TESS मिशन?

TESS मिशन 2018 च्या एप्रिल महिन्यात SPACEX फॉल्कन 9 द्वारे लाँच करण्यात आलं होतं.  SpaceX उपग्रह सरळ 27 दिवस एक एकल स्थानाचं निरीक्षण करते आणि प्रत्येक 30 मिनिटांमध्ये फोटो काढते. यामुळं वैज्ञानिकांना ताऱ्यांमधील प्रकाश आणि चढ उताराची माहिती मिळण्यास मदत होते. या ग्रहांना गोचर म्हणूनही ओळखलं जातं.  या मिशनच्या माध्यमातून नासातील वैज्ञानिकांना नव्या ग्रह आणि ताऱ्यांचा शोध घेण्यास मदत होते. या मिशनच्या माध्यमातूनच या दोन सूर्य असलेल्या नव्या ग्रहाचा शोध लागलाय. या नव्या ग्रहाचा अभ्यास अजूनही सूरू आहे. अभ्यासातून आणखी काय नवी माहिती समोर येते हे आता पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 07:45 PM IST

ताज्या बातम्या