Nobel Peace Prize 2018 : नादिया मुराद आणि डॉ. डेनिस यांना शांततेचं नोबेल, लैंगिक अत्याचार पीडितांसाठी काम!

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2018 03:32 PM IST

Nobel Peace Prize 2018 : नादिया मुराद आणि डॉ. डेनिस यांना शांततेचं नोबेल, लैंगिक अत्याचार पीडितांसाठी काम!

ओस्लो, ता. 5 ऑक्टोबर : सर्व जगाचं लक्ष लागलेल्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झालीय. महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या नादिया मुराद आणि डॉ. डेनिस मौकेज या दोघांना हा पुरस्कार जाहीर झालाय. नादिया या इराकच्या याझदी समुदायातल्या आहेत.आयसीसच्या अतिरेक्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचार पीडीत मुलींच्या पुनर्वसनाचं मोठं काम त्यांनी केलंय. तर डॉ. डेनिस मौकेज हे काँगो या देशातले सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी बलात्कार पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी उत्तम काम उभं केलं.

नोबेल पुरस्कार समितीने नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं या पुरस्काराची घोषणा केली. याझदी हा इराकमधला अल्पसंख्याक समुदाय आहे. आयसीसने या समुदायातल्या तीन हजार मुलींचं अपहर करून त्यांचा 'सेक्स स्लेव्ह' म्हणून वापर केला. त्यात नादिया मुरादही होती. आयसीसच्या ताब्यातून सुटल्यानंतर तीने अशा पीडीत मुलींसाच्या हक्कासाठी चळवळ उभारली आणि जगाचं लक्ष वेधून घेतलं.

डॉ. डेनिस यांनी काँगोतल्या यादवीत होरपळलेल्या 85 हजार महिलांवर उपचार केलेत. त्यांनी बुकाव्हू इथं हॉस्पिटल उभारून गृहयुध्दात लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांवर उपचार केला आणि त्यांना आधार दिला. संयुक्त राष्ट्रानेही त्यांच्या या कामाची दखल घेतली होती.

स्वीडनच्या पुरस्कार निवड समितीने ही पुरस्कारासाठी या दोघांची निवड केले असून त्यात पाच जणांचा समावेश आहे. या समितीकडे जगभरातून 331 नामांकनं आली होती. त्यात व्यक्ती आणि संघटनांचा समावेश आहे. समितीने या सर्व नामांकनांचा काटेकोरपणे अभ्यास केला, चर्चा केली आणि नंतर नावांची घोषणा केली.

1901 पासून शांततेचं नोबेल पारितोषिक द्यायला सुरवात झाली. समितीकडे आलेल्या नामांकनांबाबत अतिशय गुप्तता पाळली जाते. असं असलं तरी अनेकदा समितीने निवडलेल्या नावांबाबत वाद निर्माण झाले आहेत. तसच अनेकदा विविध आरोपही झालेत. असं असलं तरीही या पुरस्काराची प्रतिष्ठा कमी झालेली नाही.

Loading...

यावर्षी सर्वाधिक चर्चा होती ती उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून-जेइ-इन यांची. अमेरिका आणि उत्तर कोरिया चर्चेसाठी एकत्र आल्याने इतिहास घडला आणि जगावरचं युद्धाचं संकट टळलं असं मानलं जात होतं.

गडकरी म्हणतात, 'पवारसाहेब कधी काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही'

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2018 03:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...