मोरक्को, 23 जून : लॉकडाऊनच्या काळात हॅकिंगची प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. अशावेळी कोणतीही संदिग्ध लिंक, बनावट माहिती, फ्रॉड मेसेज यावर क्लिक केल्याने हा धोका वाढतो आहे. मात्र नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये कोणत्याही वेबसाइटवर गेल्यावर त्या व्यक्तिचा फोन हॅक केला जात आहे. मोरक्कोमधील पत्रकार उमर रादी (Umar Radi) चिप बसवण्यात आलेला पांढऱ्या रंगाचा फोन वापरत होते, अशी माहिती उघड झाली आहे. जेणेकरून त्यांचे सरकारला त्यांच्यावर नजर ठेवता येईल. याप्रकारे त्यांचे सरकार त्यांचा प्रत्येक मेसेज, मेल यावर नजर ठेवून होते. या पत्रकाराचा प्रत्येक फोन कॉल ऐकता यावा, त्यांची प्रत्येक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बघता यावी याकरता ही चिप बसवण्यात आली होती. फोनमध्ये करण्यात येणाऱ्या प्रत्येक हालचालीची सरकारला खबर होती.
(हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात वर्क फ्रॉम होम पडेल महागात! द्यावा लागणार जास्त Income Tax)
द स्टारच्या अहवालानुसार, रादी यांना एन्क्रिप्शन आणि सायबर सुरक्षा या विषयात प्रशिक्षित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ना कोणत्याही संदिग्ध लिंकवर क्लिक केले होते ना त्यांना व्हॉट्सअॅपवर कोणता मिसकॉल आला होता. या दोन्ही मार्गांनी फोन हॅक होण्याचा धोका अधिक आहे. द स्टार ने Amnesty International चा हवाला देत असे लिहिले आहे की, रादी यांना एक नवीन आणि भीतीदायक गूढ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टारगेट केले जात आहे. अशी माहिती मिळाली आहे की, रादी यांनी कोणतीही वेबसाइट ओपन केल्यास त्यांना टारगेट केले जाऊ शकते.
(हे वाचा-ATM मधून पैसे काढण्यासाठी येणार 5000 रुपयांची मर्यादा, RBI ने आखला नवा प्लॅन)
Amnesty International ने रादी यांच्या फोनमधून गोळा केलेल्या फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे त्यांचा फोन नेटवर्क इंजेक्शन (Network Injection) मुळे संक्रमित होता. नेटवर्क इंजेक्शन एक पूर्णपणे ऑटोमेटेड पद्धत आहे, ज्यामुळे तुम्ही कोणत्या वेबसाइटवर जात असाल तर हॅकर एका सेल्यूलर सिग्नलला अटकाव करतो.
सेकंदापेक्षा कमी वेळात होतो फोन हॅक
मिली सेकंदांमध्ये वेब ब्राऊजरला मॅलिशियस वेबसाइटवर आणले जाते आणि स्पायवेअर कोड डाऊनलोड केला जातो. ज्यामुळे हॅकरला फोनचा रिमोट अॅक्सेस मिळतो. त्यानंतर ब्राउजरला इच्छित वेबसाइटवर पाठवले जाते आणि युजरची फसवणूक केली जाते. Amnesty International याबाबत खात्रीशीररित्या हे नाही सांगू शकत आहेत की यामागे मोरक्को सरकारचा होता, पण फॉरेन्सिक पुरावे याकडेच इशारा करत आहेत.
(हे वाचा-90 दिवसांनतर सुरू होणार आंतरराष्ट्रीय विमानसेवा? नागरी उड्डाण मंत्र्यांचे संकेत)
सत्तारुढ सरकार त्यांच्या शक्तिचा वापर करत असल्याचा आरोप केला जात आहे. मोरक्कोच्या अधिकाऱ्यांवर आधीपासून संशय होता अशी प्रतिक्रिया रादी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hacking, Online fraud