मोदी - जिनपिंग शाही मेजवानीचा हा आहे खास मेन्यू, चीनी पाहुणेही पडतील प्रेमात

शी हे आईटीसी ग्रँड चोला (ITC Grand Chola) हॉटेल मध्ये थांबणार आहेत. इथं पंतप्रधान मोदी हे शी यांच्यासह चीनी शिष्टमंडळाला शाही मेजवानी देणार असून त्यासाठी खास मेन्यू तयार करण्यात आलाय.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 03:06 PM IST

मोदी - जिनपिंग शाही मेजवानीचा हा आहे खास मेन्यू, चीनी पाहुणेही पडतील प्रेमात

चेन्नई 11 ऑक्टोंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्यात तमिळनाडूतल्या (Tamil Nadu)  महाबलीपूरम (Mahabalipuram) इथं दोन दिवसांची शिखर परिषद आजपासून सुरू होतेय. ही परिषद अनौपचारिक शिखर परिषद असल्याने त्याचा कुठलाही अजेंडा ठरलेला नाही. ही परिषद भव्य व्हावी यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. या तयारीत कुठलीही कसर राहू नये यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी खास लक्ष ठेवून आहेत. चेन्नईत आल्यानंतर शी हे आईटीसी ग्रँड चोला (ITC Grand Chola) हॉटेल मध्ये थांबणार आहेत. इथं पंतप्रधान मोदी हे शी यांच्यासह चीनी शिष्टमंडळाला शाही मेजवानी देणार असून त्यासाठी खास मेन्यू तयार करण्यात आलाय.

राफेलच्या पूजनाचं पाक लष्करानं केलं समर्थन, म्हणाले...

हा मेन्यू तयार करण्यासाठी शी आणि त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळाच्या आवडी-निवडी यांची खास काळजी घेण्यात आलीय. शी यांची आवड लक्षात घेऊन दुपारच्या जेवणात कांदा आणि मीट यांचा वापर असलेले पदार्थ, गाजर आणि पत्ता कोबी घालून केलेलं फ्राईड लिव्हर, नुडल्स आणि विविध प्रकारचे सूप आहेत. त्याच बरोबर दक्षिण भारतीय पदार्थांचीही रेलचेल राहणार आहे. त्यात बासमती भाताचे विविध पदार्थ, सांबार, वडा कुलंबू, रस्सम, बिर्याणी, बटर नान, रोटी, टोमॅटो आणि गाजराचं सूप यांचा समावेश आहे.

चीनने पाकिस्तानला दाखवला ठेंगा, उधार विमानं द्यायला नकार

तर नाश्त्यामध्ये डोसा, इडली, वडा, सांबार, चटनी, वेन पोंगल, इडियप्‍पम आणि वडा करी  यांचा समावेश आहे. हे पदार्थ बनविण्याची जबाबदारी खास शेफवर सोपविण्यात आलीय. यासाठीचे सर्व पादार्थ अतिशय उच्च प्रतिचे आणि ऑरगॅनिक पद्धतीचे असतिल याची काळजी घेण्यात आलीय. त्याचबरोबर एक खास शेफ शी जिनपिंग यांना इथल्या पदार्थांचा माहिती देणार आहे.

Loading...

740 कोटींचा घोटाळा, Ranbaxy च्या माजी प्रमोटरला अटक

गेल्या पाच वर्षांमध्ये मोदी आणि जिनपिंग हे तब्बल 14 वेळा भेटलेले आहेत. या आधी 2018मध्ये मोदी जिनपिंग यांची चीनमधल्या वुहान इथंही अनौपचारिक शिखर परिषद झाली होती. दोन्ही देशांमधल्या विविध प्रश्नांवर थेट दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होत असल्याने दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक बळकटी मिळेल अशी आशा व्यक्त केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 03:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...