सौदीचा राजकुमार अमेरिकन अभिनेत्रीच्या प्रेमात, भेटीत दिलं थक्क करणारं 'गिफ्ट'

सौदीचा राजकुमार अमेरिकन अभिनेत्रीच्या प्रेमात, भेटीत दिलं थक्क करणारं 'गिफ्ट'

राजकुमार सलमान आणि लिंडसेमध्ये नातं मैत्रीचं आहे की रोमँटीक ?

  • Share this:

न्यूयॉर्क 31 ऑक्टोंबर : सऊदी अरबीयाचे (Saudi Arabia) चे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman) हे जगातल्या शक्तिशाली नेत्यांपैकी एक आहेत. जगभरात त्यांची ओळख MBS या टोपण नावाने होते. सौदीचे राजे वृद्धत्वामुळे थकल्याने त्यांनी 34 वर्षांचे सलमान यांच्याकडे राज्याची सूत्र दिली होती. त्यानंतर सलमान यांनी सर्व सत्ता आपल्या हातात एकवटत देशात अनिर्बंध सत्ता स्थापन केली. सौदी हा अतिशय कर्मठ देश समजला जातो. मात्र तिथल्या कोट्यधीश अरबांच्या रोमँटीक कहाण्या जगभर चर्चेचा विषय ठरतात. आता सलमान यांच्या अफेअर्सची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. सलमान हे एका अमेरिकन अभिनेत्रीच्या प्रेमात असून तिला भेटण्यासाठी ते खास जेटने जात असतात. त्यांनी तिला जे गिफ्ट्स दिल्या आहेत त्याबद्दलही अनेक सुरस कथा सांगितल्या जात आहेत.

सत्ता वाटणीसाठी CM आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली, मनोहर जोशींचा गौप्यस्फोट

तेलाच्या पैशामुळे आलेली श्रीमंती, खानदाणी राहणीमान आणि आपल्या देशात कडक निर्बंध असल्याने विदेशात जाऊन मौज मजा करण्यासाठी श्रीमंत अरबांना ओळखलं जातं. आता गोष्ट खुद्द सौदीच्या राजकुमाराचीच असल्यानं त्याची चर्चा झाली नसली तरच नवल. मोहम्मद बिन सलमान आणि अमेरिकेची ग्लॅमरस अभिनेत्री लिंडसे लोहान (Lindsay Lohan) हिच्यात अफेअर सुरू आहे अशी जोरदार चर्चा आहे. लिंडसेला भेटण्यासाठी सलमान हे आपल्या अलिशान जेटने जात असतात.

सलमान हे लिंडसेला प्रत्येक भेटीत सरप्राईज गिफ्ट देतात. हे गिफ्ट्स अब्जावधी रुपयांची असतात, त्यात महागड्या आणि दुर्मिळ वस्तू, मौल्यवान किंमती दागिने अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. एका भेटीत तर सलमान यांनी तिला एक क्रेडीट कार्डच भेट दिलं. त्यात एवढे पैसे आहे की ते लिंडसेला मोजणही शक्य नाही असंही बोललं जातंय.

चक्क अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर, नायकानं दिलं हे उत्तर!

मात्र लिंडसेच्या प्रवक्त्याने सलमान यांनी असं कुठलं कार्ड दिल्याचं वृत्त फेटाळून लावलय. 'द सन'ला दिलेल्या प्रतिक्रियेत लिंडसेच्या वडीलांनी सलमान आणि तिच्यातलं अफेअर्सचं वृत्त फेटाळून लावलंय. सलमान आणि लिंडसेमध्ये मैत्री आणि सन्मानाचं नातं असून ते नातं रोमँटीक नाही असं मायकेल लिंडसे यांनी म्हटलं आहे. लिंडसेचे मध्य पूर्वेतल्या अनेक मान्यवरांशी चांगले संबंध आहेत. त्यात सलमान यांचाही समावेश आहे. लिंडसे ही अनेक सामाजिक कामात सक्रीय असल्याने त्या कामासाठी तिची आणि सलमान यांची भेट झाली होती असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 04:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading