Howdy Modi: अमेरिकेत नरेंद्र मोदींसाठी खास 'नमो थाली', असा आहे मेन्यू!

Howdy Modi: अमेरिकेत नरेंद्र मोदींसाठी खास 'नमो थाली', असा आहे मेन्यू!

वाढदिवसाला मोदींनी आपल्या आईसोबत दुपारचं जेवण घेतलं होतं. त्यावेळी जेवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरूनही पदार्थांचा अंदाज घेण्यात आलाय.

  • Share this:

ह्युस्टन 22 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 'हाऊडी मोदी' (Howdy Modi ) कार्यक्रमाची चर्चा जगभर आहे. अमेरिकेच्या (USA) टेक्सास या राज्यातल्या ह्युस्टनमध्ये अमेरिकेत राहणाऱ्या 50 हजार नागरिकांसमोर मोदींचं भाषण होणार असून या कार्यक्रमाला खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) उपस्थित राहणार आहेत. एखाद्या देशाच्या प्रमुखासोबत तब्बल काही तास उपस्थित राहण्याची अमेरिकेच्या अध्यक्षांची ही पहिलीच वेळ आहे. या कार्यक्रमात ट्रम्प हे भाषणही करणार आहेत. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल आहे. पंतप्रधान मोदींसाठी खास शाकाहारी गुजराती मेन्यूही (Menu for Modi) तयार करण्यात आलाय. मोदींच्या आवडी निवडींची खास काळजी घेण्यात आली असून नामांकीत शेफ हे स्वादीष्ट पदार्थ तयार करणार आहेत.

लोकलपासून ते ग्लोबलपर्यंत 'Howdy Modi'चीच चर्चा, काय आहे शब्दाचा अर्थ?

या मेन्यूत मेथीचा थेपला, खांडवी, समोसा, दाळ-भात, गाजराचा हलवा, रसमलाई, गुलाबजाम, कचोरी, पुदीन्याची चटनी, खिचडी आणि कढी असे खास पदार्थ तयार करण्यात आले आहेत. टेक्सासमधल्या नामांकित शेफ किरण वर्मा यांच्यावर मोदी आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळासाठी शाही भोजन तयार करण्याची जबाबदारी देण्यात आलीय. वाढदिवसाला मोदींनी आपल्या आईसोबत दुपारचं जेवण घेतलं होतं. त्यावेळी जेवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरूनही पदार्थांचा अंदाज घेण्यात आलाय.

या कार्यक्रमाला  रिपब्लिक आणि डेमेक्रॅटिक पक्षांचे अने खासदार आणि गनमान्य व्यक्तीही उपस्थित राहणार आहेत. ह्युस्टन हे शहर एनर्जी सीटी म्हणून ओळखलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वांच्या ऊर्जा कंपन्यांच्या CEOसोबत चर्चा केली. मोदी सात दिवस अमेरिकेत राहणार असून 27 सप्टेंबरला ते संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबंधित करणार असून त्याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेही आमसभेत बोलणार आहेत.

अमेरिकेत पोहोचलेल्या PM मोदींवर कौतुकाचा वर्षाव, असं नेमकं काय केलं पाहा VIDEO

पाकिस्तान समर्थित काही गट यावेळी भारताविरोधात निदर्शनं करण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय. इम्रान खान हे संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून काश्मीरचा प्रश्न उपस्थित करणार आहेत. तर मोदी हे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटं पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 07:38 PM IST

ताज्या बातम्या