मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Kiss नव्हे हा तर ‘कोरोना’चा दंश, Kiss Day ला राहा सावध !

Kiss नव्हे हा तर ‘कोरोना’चा दंश, Kiss Day ला राहा सावध !

बॉलिवूडमध्ये येण्यासाठी अनेक अभिनेत्रींना बरंच स्ट्रगल करावं लागत. अनेकदा सिनेमांच्या ऑडिशनच्या वेळी त्यांना वाईट अनुभवांनाही सामोर जावं लागतं. पण याबाद्दल पूर्वी फारसं न बोलणाऱ्या अभिनेत्री आता मात्र बोलू लागल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये येण्यासाठी अनेक अभिनेत्रींना बरंच स्ट्रगल करावं लागत. अनेकदा सिनेमांच्या ऑडिशनच्या वेळी त्यांना वाईट अनुभवांनाही सामोर जावं लागतं. पण याबाद्दल पूर्वी फारसं न बोलणाऱ्या अभिनेत्री आता मात्र बोलू लागल्या आहेत.

तरुणांमध्ये सध्या वॅलेंटाइन वीकचा (Valentine Week) उत्साह आहे. 13 फेब्रुवारीला Kiss Day आहे. या दिवसाची उत्सुकता तुम्हा सर्वांना असेल, मात्र त्याआधी ही बातमी तुम्ही वाचायलाच हवी.

  • Published by:  Priya Lad

तैवान, 10 फेब्रुवारी : तरुणांमध्ये सध्या वॅलेंटाइन वीकचा (Valentine Week) उत्साह आहे. 13 फेब्रुवारीला किस डे  (Kiss Day) आहे. या दिवसाची उत्सुकता तुम्हा सर्वांना असेल, मात्र या दिवशी थोडं सावध राहा ! कारण Kiss Day ला तुम्हाला मिळणारी Kiss म्हणजे 'कोरोना'चा दंश असू शकतो. किसमुळे कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण होण्याचा धोका आहे आणि यामुळे चीनच्या (China) तैवानमध्ये (Taiwan) किस करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाव्हायरसचा प्रकोप पाहता कोरोनाव्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी तैवानमध्ये सिनेमा आणि सीरियल्समधील किसिंग सीन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

युनायटेड डेली रिपोर्टनुसार कोरोनाव्हायरसचा धोका पाहता तैवानमध्ये दाखवण्यात येणाऱ्या टीव्ही सीरियल्ससाठी किसिंग सीनचं (kissing scene) शूटिंग करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. तसंच टीव्ही आणि सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनीही जास्त जवळ येऊन बोलू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

हेदेखील वाचा सावधान ! भारताला 'कोरोना'चा सर्वाधिक धोका, ‘या’ शहरांत झपाट्याने पसरेल व्हायरस

फोरसोमा टीव्हीवर प्रसारित होणारी सीरियल गोल्डन सिटीमध्ये अभिनेत्री मिया चिऊ आणि अभिनेता जून फू यांच्यामध्ये कित्येक वेळा किसिंग सीन दाखवण्यात आलेत. मात्र कोरोनाव्हायरसचा धोका पाहता दोन्ही कलाकारांना अशाप्रकारची दृश्ये चित्रित न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. टीव्ही कलाकारांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

अभिनेत्री चिऊने सांगितलं की, कोरोनाव्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठीअशाप्रकारे सावधानता बाळगली जात आहे, हे खूपच चांगल आहे. आपणही कोरोनाव्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी आपल्या परीने जे शक्य आहे, ते सर्व करून असंही ती म्हणाली.

चीनमध्ये 900 पेक्षा अधिक बळी

चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत 908 जणंचा मृत्यू झाला आहे. तर 40,000 पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. काल (रविवारी) 3,062 नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. तर 97 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. यात फक्त हुबेई प्रांतातील 91 जणांचा समावेश आहे.

हेदेखील वाचा - जपानच्या क्रुझला 'कोरोना'चा विळखा; शेकडो भारतीयही अडकले

First published:

Tags: Coronavirus, Kiss day, Valentine day