चांद्रयान-2नंतर भारत घेणार आणखी एक झेप, इस्रोनं जाहीर केले ‘मिशन गगनयान’

विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर आता इस्रोनं जाहीर केले नवे मिशन.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 12:08 PM IST

चांद्रयान-2नंतर भारत घेणार आणखी एक झेप, इस्रोनं जाहीर केले ‘मिशन गगनयान’

बंगळुरू, 21 सप्टेंबर : भारताच्या चांद्रयान मोहिमेतील लँडर विक्रमसोबत केवळ इस्त्रोच्या नाही तर साऱ्या देशाच्या आशा होत्या. इस्त्रोच्या अपेक्षा होत्या की, लँडर विक्रमशी संपर्क होईल, मात्र तसे झाले नाही. तरी, इस्रोच्या प्रयत्नांचे देश आणि जगभरातून कौतुक करण्यात आले. विक्रम लँडरचा संपर्क तुटला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीची इस्रोच्या नियंत्रण कक्षात होते. त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर दिला होता. दरम्यान आता इस्त्रोकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. इस्त्रोचे प्रणुख के. सिवन यांनी विक्रमशी संपर्क होत नसल्यामुळं आता आमचे लक्ष मिशन ‘गगनयान’वर असल्याचे सांगितले. याशिवाय सिवन यांनी एएनआयशी बोलताना विक्रम लॅंडरशी संपर्क होण्याच्या सर्वच शक्यता मावळल्या असल्याचे मान्य केले.

केवळ एक दिवसांचे होते विक्रमचे जीवन

आपल्या 47 दिवसांच्या प्रवासात चांद्रयान -2 ने अनेक अडथळे पार केले. मात्र चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना अनियंत्रित वेगामुळं हार्ड लँडिंग झाली. दरम्यान, चांद्रयान-2च्या ऑर्बिटरनं विक्रम लँडरची काही छायाचित्रे पाठवली होती. त्यानंतर इस्रोनं विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश मिळू शकलं नाही. लॅंडरचा जीवनकाळ चंद्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचा 14 दिवस आहे. 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणाऱ्या विक्रम लॅंडरचे जीवन शनिवारी संपले. 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरपर्यंत एक दिवस पूर्ण झाल्यानंतर शनिवारी चंद्रावर रात्र होईल. त्यामुळं सिवननं यांनी गगनयानचे संकेत देत विक्रम लॅंडरचा संपर्क होणे शक्य नसल्याचेही संकेत दिले.

वाचा-कंगाल पाकिस्तानचं पुन्हा जगभरात झालं हसं, बसला 18 कोटींचा फटका!

ऑर्बिटरचे काम सुरू

यावेळी सिवन यांनी, भारताचे ऑर्बिटर चांगले काम करत असल्याचे सांगितले. यात 8 उपकरणे आहेत, जे आपले काम करत आहे. ऑर्बिटरनं फोटो पाठवण्या सुरुवात केली आहे, शास्त्रज्ञ या फोटोंची तपासणी करत आहेत. ऑर्बिटरवर 8 पेलॉड आहेत. जे चंद्रवर थ्री-डी मॅपिंगसह दक्षिण ध्रवावर पाणी, बर्फ आणि मिनरल्स शोधण्याचे काम करतील. ऑर्बिटरचा कार्यकाळ एक वर्षांचा असणार आहे.

वाचा-पेट्रोल आणि डिझेल झालं पुन्हा महाग, 'हे' आहेत आजचे दर

नासाने केलं इस्त्रोचं कौतुक

नासाने नुकतंच भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या (इस्रो) चांद्रयान -2 अभियानाचे कौतुक केलं होतं. नासाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, 'अंतराळात संशोधन करणं एक कठीण काम आहे. चांद्रयान -2 मिशनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नांचं आम्हाला अतिशय कौतुक आहे.

वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना, असा आहे 7 दिवसांचा कार्यक्रम

VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: isro
First Published: Sep 21, 2019 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...