भयंकर! 'ते' दोघे माणसांचं मांस खात होते, कशी झाली दोघांना अटक?

भयंकर! 'ते' दोघे माणसांचं मांस खात होते, कशी झाली दोघांना अटक?

पाकिस्तानमध्ये दोघे भाऊ चक्क माणसांचं मांस खात असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे. दोघांनी आत्तापर्यंत 100 पेक्षा अधिक माणसांचं मांस खाल्लंय.

  • Share this:

पाकिस्तान, 16 जानेवारी: पाकिस्तानमधील दोघे भाऊ चक्क माणसांचं मांस खात होते. माणसाचं मांस दोघा भावांना इतक आवडत होतं की ते दफन केलेले मृतदेह काढून शिजवून खात होते. गेल्या काही वर्षात दोघा भावांनी मिळून

100 पेक्षा अधिक माणसांचं मांस खाल्ल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे.

100 पेक्षा जास्त मृतदेहाला खाल्लं

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील हे दोघे भाऊ हैवानालाही लाजवेल असं कृत्य करत होते.  दोघांना प्राण्यांचं मांस खाणं खुप आवडत होतं. मात्र एकदा त्यांना प्राण्यांचं मांस मिळालं नाही. त्यामुळं त्यांनी स्मशानभूमीतील दफन केलेले मृतदेह उखरून खाण्याचं ठरवलं. त्यानंतर तर त्यांना माणसांचं मांस आवडायला लागलं आणि ते रोजच स्मशानभूमीतील दफन केलेले मृतदेह घरी आणत आणि त्यांचे तुकडे करून शिजवून  खात होते. मृतदेह दफन करण्यासाठी आल्यावर त्यावर ते दोघे भाऊ नजर ठेवत असत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघे भाऊ दफन केलेला मृतदेह बाहेर काढून घरी नेत होते. त्यानंतर त्याचं मांस खात होते.

कसं पकडलं दोघांना ?

स्मशानभूमीत एका महिलेचा मृतदेह दफन करण्यात आलं होतं.  मृतदेह दफन केल्यानंतर 24 तासात गायब झाला होता.  दफन केलेला मृतदेह कुठे गायब झाला याची तपासणी करण्यात आली. तपासणीत  तिथे असलेले मोहम्मद आरमान आणि मोहम्मद आरिफ या दोघांची चौकशी करण्यात आली.  चौकशीतून या दोघांनी मृतदेह गायब केल्याचं समोर आलं. मात्र दोघे मृतदेहाचं काय करत होते याचं कारण जेव्हा पोलिसांनी कळलं तर त्यांना मोठा धक्काच बसला. हे दोघे गायब केलेल्या मृतदेहाचे मांस खात होते. मृतदेहाचे तुकडे करून ते शिजवलं जातं होतं आणि त्यानंतर हे दोघे ते खात होते. येवढचं नाही तर आता पर्यंत 100 पेक्षा अधिक मृतदेहाचं  मांस या दोघांनी मिळून खाल्ल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिलीय.

दोघांना काय शिक्षा द्यावी प्रश्न?

दफन केलेल्या माणसांचं मांस खाणं तस गुन्हा आहे. मात्र कायद्यात अशा गुन्ह्याविषयी शिक्षेची तरतुद नाही. त्यामुळं दोघांना काय शिक्षा द्यावी असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. दोघांवर मृतदेहाशी छेडछाड आणि मृतकांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी  गुन्हा नोंद करण्यात आला. दोघांना दोन वर्षांची शिक्षा झाली तसेच दंडही करण्यात आला. दोघेही मानसिक रुग्ण असल्याचं डॉक्टारांचं म्हणण आहे. त्यामुळं त्यांच्यावर उपचारही सुरू आहे.

तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा तेच कृत्य

दोन वर्षाचा तुरुंगवास आणि दंड भरल्यानंतर दोघे पुन्हा मुळ गावी परत आले. गावातील लोकं ह्या दोघांना घाबरत होते. त्यामुळं गावात दोघांची दहशत निर्माण केली. अनेकांना दोघे भाऊ मारहाण करत होते. त्यानंतर 2014 साली पुन्हा दोघांच्या घरातून सडण्याचा वास येवू लागला. त्यामुळं शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घराची तपासणी केली असता त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांच्या घरात लहान मुलाचं मुंडक पडलं होतं. तर दुसऱ्या बाजुला हाडं होती तर पातेल्यात मांस शिजत होतं. पोलिसांनी दोघांना पुन्हा अटक केली आणि दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून दोघांना 12 वर्षाची शिक्षा देण्यात आली.

नवा कायदा पास

पुरलेला मृतदेह उकरून त्याचं मांस खाल्ल्या प्रकरणी कायदाचं नसल्यानं नराधमांना शिक्षा झाली नाही. मात्र असा गुन्हा पुन्हा होऊ शकतो हे लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारनं तसा कायदा करून तो पास केला. त्यामुळं मृतदेहाचं मांस खाण आणि मृतदेह उकरून बाहेर काढणं याला आता कायद्यानुसार शिक्षा होणार आहे. तसा कायदाच पाकिस्तानात पास करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2020 09:38 PM IST

ताज्या बातम्या