इम्रान यांच्या पत्नीबद्दल पत्रकाराचा अजब दावा, जगभरात उडवली जातेय पाकिस्तानची खिल्ली

इम्रान यांच्या पत्नीबद्दल पत्रकाराचा अजब दावा, जगभरात उडवली जातेय पाकिस्तानची खिल्ली

इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी सध्या एका भलत्याच कारणामुळं चर्चेत आहे.

  • Share this:

कराची, 29 सप्टेंबर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगभरात कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असतात. आता मात्र इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी सध्या एका भलत्याच कारणामुळं चर्चेत आहे. मुख्य म्हणजे हे कारण आहे अंधश्रध्दा. पाकिस्तानमधील एका पत्रकारानं असा दावा केला आहे की, इम्रान यांची पत्नी आणि पाकिस्तानची प्रथम महिला बुशरा बीबी यांचा चेहरा कधीच आरशात दिसत नाही. या धक्कादायक खुलासानंतर पाकिस्तानचे पुन्हा एकदा जगभरात हसु होत आहे.

पाकिस्तानच्या या पत्रकारानं एका वृत्तवाहिनीला अशी माहिती दिली. दरम्यान पाकिस्तानी माध्यमांमध्ये बुशरा बीबी यांच्याबाबत अफवा पसरवण्यात आल्या आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या 74व्या सत्रात इम्रान खान यांनी सहभाग नोंदवला होता. त्यावेळी त्यांची पत्नी मक्का येथे बुरखा परिधान करून होती. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बुरखा परिधान केलेल्या बीबी यांचे हे फोटो पाहून त्यांचे फोटो कधीच आरशात दिसत नाही, अशा अफवा जोर धरू लागल्या.

वाचा-UN मध्ये इमरान खानना सडेतोड उत्तर देत निष्प्रभ करणारी दुर्गा, VIDEO

याआधी पाकिस्तानचे पत्रकार आतिश तासीरनं एका मॅगजिनमध्ये असा दावा करण्यात आला होता की, बुशरा बीबी यांच्याकडे दोन जिन असून हे जिन त्यांच्या सांगण्यानुसार काम करतात. एवढेच नाही तर बुशरा बीबी या पिंकी पिरनी या नावानं ओळखल्या जातात.

अंधश्रध्दाळु आहे बुशरा

बुशराही अंधश्रध्दाळु असून तीचा तंत्र-मंत्र आणि जादू-टोनावर विश्वास आहे. बुशरा इस्लामिक धर्मातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करते. लोकांमध्ये त्यांची ओळख नशीब बदलणारी महिला अशी आहे.

वाचा-पाकची वकिली करणाऱ्या तुर्कस्तानला PM मोदींचा दणका

बुशरा यांचे भक्त आहेत इम्रान

इम्रान यांनी पंतप्रधान होण्याची सहा महिन्यांआधी बुशरा यांच्याशी विवाह केला होता. त्यामुळं असे म्हटले जाते की बुशरा यांच्या जादूमुळं इम्रान पुन्हा पंतप्रधान झाले. या दोघांची पहिली भेट 2015मध्ये झाली होती. त्यानंतर इम्रान यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्पोट देत बुशरा यांच्याशी विवाह केला.

वाचा-सरकारच्या नाकावर टिच्चून पॉर्न साइटचं कमबॅक!

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 08:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading