मोदींनी पाकिस्तानला सुनावलं, ज्यांना स्वत:चा देश सांभाळता येत नाही त्यांनी भारताबद्दल बोलू नये

मोदींनी पाकिस्तानला सुनावलं, ज्यांना स्वत:चा देश सांभाळता येत नाही त्यांनी भारताबद्दल बोलू नये

पाकिस्तान 370 कलमावरून भारताविरुद्ध अपप्रचार करतोय, त्याला मोदींनी अध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत उत्तर देत पाकिस्तानला सुनावल्यानं त्याला विशेष महत्त्व आहे.

  • Share this:

ह्युस्टन 22 सप्टेंबर :अमेरिकेच्या (USA) ह्युस्टनमध्ये रविवार गाजवला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी. इथल्या एनआरजी स्टेडियममध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी' (Howdy Modi ) कार्यक्रमात मोदींनी आपल्या भाषणाने सगळ्यांची मने जिंकून घेतली. या कार्यक्रमाला 50 हजारांपेक्षा जास्त भारतीय उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचं स्टेडियममध्ये आगमन होताच सर्व नागरिकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत केलं. भारत माता की जय, वंदे मातरम् आणि जय श्रीराम या घोषणांनी लोकांनी सगळं स्टेडियम दणणून सोडलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानचं नाव न घेता त्यांना चांगलच सुनावलं. ते म्हणाले, ज्यांना आपला देश सांभाळता येत नाही त्यांनी भारताबद्दल बोलू नये. आमचा शेजारी देश दहशतवादाला पाठिंबा देतो, पोसतो. अमेरिकेवरचा हल्ला असो की भारताततले हल्ले अशा सगळ्या घटनांचे म्होरके पाकिस्तानात राहतात. सर्व जगाने अशा देशाविरुद्ध एकत्र येण्याची गरज आहे असं आवहानही त्यांनी केलं. ते पुढं म्हणाले, अध्यक्ष ट्रम्प यांचा निर्धार अशा प्रवृत्तीविरुद्ध लढण्याचा आहे त्यांना सगळ्यांनी उभं राहून धन्यवाद दिले पाहिजे.

मोदींनी फोडला ट्रम्प यांच्या प्रचाराचा नारळ म्हणाले, 'अगली बार ट्रम्प सरकार'

पाकिस्तान 370 कलमावरून भारताविरुद्ध अपप्रचार करतोय त्याला मोदींचं हे उत्तर असल्याचं बोललं जातंय. अध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत मोदींनी पाकिस्तानला सुनावल्यानं त्याला विशेष महत्त्व आहे. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेही अमेरिकेत आहेत. ट्रम्प यांनी सहकुटुंब भारतात यावं असं निमंत्रणही मोदींनी दिलं. ह्युस्टनचे महापौर सिल्वेस्टर यांनी यावेळी मोदींना मानाची शहराची चावी मोदी यांना भेट दिली. पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मोदींनी अध्यक्ष ट्रम्प यांचं तोड भरून कौतुक केलं. अध्यक्ष ट्रम्प यांनी अतिशय कठिण परिश्रमाने अमेरिकेला यशाच्या शिखरावर नेलं असं म्हणत त्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत अगली बार ट्रम्प सरकार असा नाराही दिला.

पाकिस्तानने युद्धाची चूक केली तर उद्धवस्त करून टाकू, राजनाथ सिंग

पुढच्या वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणुक आहे. त्या पार्श्वभूमीवर 50 हजारांपेक्षा जास्त भारतीयांसमोर मोदींनी अशी घोषणा करणं याचा महत्त्व प्राप्त झालंय. मोदींची ही घोषणा म्हणजे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना स्पष्ट संकेत असल्याचं बोललं जातंय.

यावेळी बोलताना अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताचं आणि नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना अतिशय मोठं विधान केलं. ते म्हणाले भारत आणि अमेरिका इस्लामिक दहशतवादाविरुद्ध एकत्र लढतील. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानं नवं वादळ निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. काही वर्षींपूर्वीही ट्रम्प यांनी असं विधान केलं होतं त्यावर वादळ निर्माण झालं होतं. दहशतवादाला कुठलाही रंग नसतो असं म्हटलं जात असताना अध्यक्ष ट्रम्प हे रंग देत आहेत अशीही टीकाही होण्याची शक्यता आहे.

'हाऊडी मोदी' म्हणजे काय?

'Howdy' हा शब्द 'How do you do' याचं संक्षिप्त रूप आहे. 'Howdy' या शब्दाचा अर्थ म्हणजे 'तुम्ही कसे आहात'. अमेरिकेतील पाश्चात्य राज्यांमध्ये 'Howdy' या शब्दाचा प्रयोग तेथील बोलीभाषेत प्रचलित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 12:14 AM IST

ताज्या बातम्या