Howdy Modi: इस्लामिक दहशतवादाविरुद्ध एकत्र लढणार - डोनाल्ड ट्रम्प

काही वर्षींपूर्वीही ट्रम्प यांनी असं विधान केलं होतं त्यावर वादळ निर्माण झालं होतं. दहशतवादाला कुठलाही रंग नसतो असं म्हटलं जात असताना अध्यक्ष ट्रम्प हे रंग देत आहेत अशीही टीकाही होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 12:19 AM IST

Howdy Modi: इस्लामिक दहशतवादाविरुद्ध एकत्र लढणार - डोनाल्ड ट्रम्प

ह्युस्टन 22 सप्टेंबर :अमेरिकेच्या (USA) ह्युस्टनमध्ये रविवार गाजवला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी. इथल्या एनआरजी स्टेडियममध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी' (Howdy Modi ) कार्यक्रमात मोदींनी आपल्या भाषणाने सगळ्यांची मने जिंकून घेतली. या कार्यक्रमाला 50 हजारांपेक्षा जास्त भारतीय उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचं स्टेडियममध्ये आगमन होताच सर्व नागरिकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत केलं. भारत माता की जय, वंदे मातरम् आणि जय श्रीराम या घोषणांनी लोकांनी सगळं स्टेडियम दणणून सोडलं. ह्युस्टनचे महापौर सिल्वेस्टर यांनी यावेळी मोदींना मानाची शहराची चावी मोदी यांना भेट दिली. पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मोदींनी अध्यक्ष ट्रम्प यांचं तोड भरून कौतुक केलं. अध्यक्ष ट्रम्प यांनी अतिशय कठिण परिश्रमाने अमेरिकेला यशाच्या शिखरावर नेलं असं म्हणत त्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत अगली बार ट्रम्प सरकार असा नाराही दिला. पुढच्या वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणुक आहे. त्या पार्श्वभूमीवर 50 हजारांपेक्षा जास्त भारतीयांसमोर मोदींनी अशी घोषणा करणं याचा महत्त्व प्राप्त झालंय. मोदींची ही घोषणा म्हणजे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना स्पष्ट संकेत असल्याचं बोललं जातंय.

यावेळी बोलताना अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताचं आणि नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना अतिशय मोठं विधान केलं. ते म्हणाले भारत आणि अमेरिका इस्लामिक दहशतवादाविरुद्ध एकत्र लढतील. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानं नवं वादळ निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. काही वर्षींपूर्वीही ट्रम्प यांनी असं विधान केलं होतं त्यावर वादळ निर्माण झालं होतं. दहशतवादाला कुठलाही रंग नसतो असं म्हटलं जात असताना अध्यक्ष ट्रम्प हे रंग देत आहेत अशीही टीकाही होण्याची शक्यता आहे.

'हाऊडी मोदी' म्हणजे काय?

'Howdy' हा शब्द 'How do you do' याचं संक्षिप्त रूप आहे. 'Howdy' या शब्दाचा अर्थ म्हणजे 'तुम्ही कसे आहात'. अमेरिकेतील पाश्चात्य राज्यांमध्ये 'Howdy' या शब्दाचा प्रयोग तेथील बोलीभाषेत प्रचलित आहे.

पंतप्रधान मोदींसाठी मेगा इव्हेंटचं आयोजन

Loading...

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. 1000 हून अधिक व्हॉलिंटिअर्स (स्वयंसेवक) या कार्यक्रमासाठी गेली काही दिवस झटत होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तब्बल 50 हजारहून अधिक नागरिकांनी नावनोंदणी केली होती. विशेष म्हणजे पोप यांच्यानंतर अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नेत्याच्या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. मोदींच्या भाषणापूर्वी येथे रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला ह्युस्टनच्या महापौरांशिवाय अनेक गणमान्य व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

पंतप्रधान मोदींसाठी खास शाकाहारी गुजराती मेन्यूही (Menu for Modi) तयार करण्यात आलाय. मोदींच्या आवडी निवडींची खास काळजी घेण्यात आली असून नामांकीत शेफ हे स्वादीष्ट पदार्थ तयार करणार आहेत.

लोकलपासून ते ग्लोबलपर्यंत 'Howdy Modi'चीच चर्चा, काय आहे शब्दाचा अर्थ?

या मेन्यूत मेथीचा थेपला, खांडवी, समोसा, दाळ-भात, गाजराचा हलवा, रसमलाई, गुलाबजाम, कचोरी, पुदीन्याची चटनी, खिचडी आणि कढी असे खास पदार्थ तयार करण्यात आले आहेत. टेक्सासमधल्या नामांकित शेफ किरण वर्मा यांच्यावर मोदी आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळासाठी शाही भोजन तयार करण्याची जबाबदारी देण्यात आलीय. वाढदिवसाला मोदींनी आपल्या आईसोबत दुपारचं जेवण घेतलं होतं. त्यावेळी जेवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरूनही पदार्थांचा अंदाज घेण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2019 11:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...